गर्भाशयाची पिशवी ! व्यवहार पाशवी !!

0
193

गर्भाशयाची पिशवी!व्यवहार पाशवी. !

(जागतिक महिला दिन)

स्री पुरूष सामाजिक स्थिती समतेच्या रेषे पर्यत आली असे म्हणता येणार नाही. तर आज हि स्री लक्ष्मणरेषेच्या आतच आहे व तिने ती ओलांडण्यासाठी धाडस केले तर धनदांडगे रावण तिचे अपहरण करायला टपलेले असतात

आज हि समाजात सामाजिक स्री पुरूष समानता कोठे आहे.याचा शोध घेतला तर स्रीवादी चळवळीत काम करणारे परिवर्तनाची दिशा दाखविणारे यावर विचार मांडणारे विचारवंत मग त्या स्रीया असो की पुरूष असो याच मान शरमेने खाली जाईल अशीच समाज व्यवस्था समाजाच्या ठेकेदारानी व धर्ममार्तडांनी समाजात वर्चस्ववादा पायी त्यातुन गुलामाची वागणुक व मजबुत अर्थकारण करण्यासाठी अबादित ठेवली आहे.

घाम आणि दाम याच नात त्यांना समजलेच नाही.व ते समजुन घेणार हि नाहीत उलटपक्षी आपल्या वर्चस्वासाठी निरनिराळ्या कुप्त्या काढुन त्याला खतपाणी घालत राहणार समतेचे बीज समाजात रूजु लागताच त्यात विषमतेच्या तणाची बेटे कशी फोफावतील व त्यात या समतेच्या बीजाची वाढ कशी खुंटली जाईल हेच षडयंत्र या समाजव्यवस्थेच्या ठेकेदाराचे असते.

उच्च -निच यांची जातीय उतरंड गरीब – श्रीमंत यांची अर्थीक विषमता व अर्थकारण स्री- पुरूष यांच्यातील लिंगभेद हिंदु- मुस्लिम यांच्यातील धार्मिक तेढ हे प्रश्न सातत्याने तेवत ठेवले आहेत.स्री पुरूष समानतेचा हक्क तर दुरच कष्टकरी श्रमिक स्री मध्ये समानतेची जाणिव होण्या आधीच तिचा मातृत्वाचा कोशच काढुन घेतले जात आहे.

हि अवस्था अत्यंत तळागाळातील आहे.स्री समानतेसाठी लढा देणार्‍या विचारवंत वर्गाला अद्याप याची भणक देखील लागलेली नसेल किवा लागली असली तरी तो प्रांत आपलाच नाही म्हणून डोळेझाक देखील होत असेल हे मुद्दे मुद्दाम येथे महत्वाचे आहेत जेव्हा समाजात परिवर्तनाची सामाजिक हक्काची जातीय लढ्याची लिंगभेदाची मालक मजुर यांच्या घामाची व दामाच्या चळवळी उभ्या राहतात.तेव्हा समानतेचा चळवळीचा अग्रभागी असणारा झेंडा हा चळवळीतल्याच उच्च विचाराच्या किवा उच्च राहणीमानाच्या मोरक्याच्या हाती असतो व बाकीचे मेंढरा सारखे मागे चालत असतात.व गुमानपणे पुढे

फडफडत चालणारा तो झेंडा पाहत असतो.व आपल्याच जिवाची फडफड करीत तुम आगे बढो हम साथ है असे नारे कानावर येत असतात असे म्होरके हे आपण उच्च विचाराचे आहोत आपला दर्जा आपण तसा उच्च प्रतिचा ठेवला पाहीजे हा समज त्याचा झालेला असतो.किवा या चळवळीचा बिमोड करायला निघालेल्याच्या प्रलोभनाच्या जाळ्यात तो हळू हळू अडकत असतो.

कधी तरी अशी हि शंका निर्माण होते की हे म्होरके याच चळवळीचा बिमोड करायला निघालेल्याने हे म्होरके तर पेरले नसतील.कारण परिवर्तनवादी चळवळी या प्रबोधन होऊन हि वर्षानुवर्षे त्या चालतच असतात.

म्होर क्याच परीवर्तन होत असलेल दिसुन येता परंतु चळवळीत परीवर्तन घडुन आल्याच दिसुन येत नाही.कायदे करून हि ते राबविले जात नाही ते राबविण्याचा हट्टहास धरले जात नाही.तेव्हा कोणतीही समतेची चळवळ वाढीस लागण्यासाठी चळवळीतील उघड किवा छुपी विषमता आधी दुर झाली पाहीजे.

आज सामाजिक अनेक चळवळी या बिरबलाच्या मिणमिणत्या दिव्याच्या उर्जेवर खिचडी पकाव अशाच चालु आहे.स्रीवादी चळवळ हि स्री पुरूष या दोन जातीतील विषमता दुर करण्याची आहे.तिला हि शतप्रती शतच काय तर शतप्रतीशत काय असते हे विचारण्या इतकेहि यश येत नाही.

तेव्हा या देशात तर ६००० जाती आहेत.त्या जातीमध्ये देखील स्री पुरूष असमानता आहे.काही जातीमध्ये स्रीयाचे वर्चस्व तर बहुसंख्य जातीमध्ये पुरूषाचे वर्चस्व आहे.या जाती आजहि उपेक्षित आहेत.ठेवल्या जात आहे कारण जात जिवंत आहे. केवळ जातच जिवंत आहे असे नाही तर जातीच्या पोट जाती या देखील जिवंत आहेत.यात भटके आहेत.काही कडे केवळ लज्जा झाकण्या पलिकडे शरीर झाकायला देखील वस्र नाहीत. कोठे आहे मानवी जीवनातील अन्न वस्तू निवारा या मुलभूत सुविधांचे मानवतावादी घोषवाक्य

देश आमचा आहे.याच देशात निसर्गाने देखील रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल दिलेला असतो.तेथे मानव निर्मीत हा काळोख कधी दुर होतच नाही व उद्याचा उषःकाल कधी दिसतच नाही.आम्ही मात्र उद्याच्या उषःकालासाठी भाबड्या आशेवर चळवळीउभ्या करीत आहोत.

कोणत्या देशात तर ज्या मातृभुमीत आम्ही जन्मलो तिने आम्हाला जन्म दिला परंतु येथील समाज व्यवस्थेने अजन्म केवळ आमचे शरीर वाढु दिले समाज वाढू दिला नाही परंतु आमच्यातला माणुस वाढु दिला नाही.व उच्चभ्रुच्या ठायी माणुसकी हि वाढीस लागली नाही

मग तो पुरूष असो की स्री असो जेथे पुरूषच वाढु शकला नाही तिथे स्रीची काय व्यथा केवळ पाठी पुढच पोट व पाठीमागच बिऱ्हाड घेऊन आम्ही जगत आहोत.भटके म्हणुन फिरावे लागते.मातृभुमी मातृभुमी आम्ही म्हणतो याच मातृभुमीत समाजाच्या ठेकेदाराना धर्माच्या ठेकेदाराना.कारण आज हि धर्मावरच आधारीत येथील समाज व्यवस्था आहे
त्यांना मातृत्व आई या अनमोल भावनेचा अर्थच समजला नाही. म्हणुन खंत करावी लागते.

हे भारतमाते हे माता जननी आई असणारी असणारी स्री तुझे आई होणे हे निसर्गाने वरदान ठरविले आहे परंतु समाजाच्या व धर्माच्या ठेकेदारानी शाप ठरवला आहे. अशाच या शापीत समाज व्यवस्थेचा प्रश्न आता चळवळीतुन ऐरणीवर आला पाहीजे जाती व्यवस्थेतच एका कष्टकरी जातीतला हा घृणास्पद प्रकार असल्यामुळेच जातीय विषमताच मुळ आहे.हेच आम्ही आधी समजुन घेतले पाहीजे.

वर्ण व्यवस्थेचे उतरंड दुर झाली तर स्री हक्काची समानतेची चळवळ यशस्वी होईल.कारण कोठेहि जा पळसाला पान तिनच अशी प्रत्येक जाती समुहात देखील स्री विषमतेची तीच स्थिती आहे.

खालच्या समाजात व्यसनाधीन नवर्‍याच्या वागणुकीला बळी पडावे लागते.त्याच बरोबर समाज व्यवस्थेने स्रीलाच स्रीपुढे उभी करून बहाल केलेल्या हक्क गाजविणारी सासु हि स्री सर्वच समाजात अन्याय करीत असते. तर उच्चभ्रु समाजात देशमुखी पध्दत असणार्‍या वर्गात स्रीला पदराआड आपला चेहरा झाकुन जगावे लागते.मुस्लिम स्रीला बुरख्यात जगावे लागते.

तर उच्च समजल्या जाणार्‍या बाह्मण समाजात विधवा स्रीला केशवपन करून विद्रुपपणे जगावे लागते. एवढेच नाही तर जमदाग्नी यांचे आदेशानंतर परशुरामाचे रेणुका शिरा उडवले हे शीर्षक न सापडल्याने शेवटी एका मांगणीचे शीर्षक रेणुका बसविले जाते.हिच भावना मनात ठेवुन ब्राम्हण स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाही कमरेवर सहन होता हि ती माऊली कमरेवर पाण्याचा हंडा कुशीत घेते शरीर स्वतःचे असले तरी शीर्षक पुर्वापार मांगणीचेहि मानसिकतेच्या जातीयता आहे जर हि मीमांसा योग्य नाही असा कोणाचा दावा असेल तर माझ्या ब्राम्हण माऊलीच् डोक्यावर पाण्याचा हंडा का.नसतो

स्रीच्या डोक्यावर पदर म्हणजे तिचे संस्कारक्षम स्री चारीत्र्य असे असताना ब्राम्हण माऊलीच्या डोक्यावर का पदर नसतो. यामागील कारण मीमांसा विषद करावी.जात व मानसिकता कशी गळ्यात गळे घालुन वागते त्यामुळे काहीना जातीच्या नावाने गळे काढुन जगावे लागते तर काही जातीच्या उच्चभ्रुपणाने खालच्या जातीचे गळे कापले जातात

जात कोणतीही असो.प्रत्येक जातीत स्री हि उपेक्षितच हि शोकांतिका किती काळ राहणार आजच्या आधुनिक काळातही व्यवस्था प्रणालीत असणारा बाॅस देखील सहकारी स्री हि भोग वस्तु आहे.असेच समजतो एवढेच नाही पुरूषी मान खाली जायला पाहीजे असे कृत्य असताना केवळ मान मिळावा म्हणून आपलीच स्री उपभोगायला आपली स्री देणारे काही नराधम आहेत.

त्यामुळेच स्री हक्काची समानतेची चळवळ जोमाने उभी करायची असेल तर आधी जाती व्यवस्थेच प्रबोधन झाले पाहीजे.स्रीला हातच बाहुल बनवुन हि केवळ भोग वस्तुच आहे म्हणुन तिच्याकडे पाहीले जाऊ लागले.घारी गिधाड देखील कधी जिवंत प्राण्याच्या शरीराचे लचके तोडत नाही.येथे तर घारी गिधाडाहुन हि भयानकपणे जिवंत स्री शरिराचे लचके तोडले जातात.

स्रीच्या शरिरावरील हक्क तिच्या आरोग्याचा हक्क तिला रोजगार मिळविण्याचा हक्क केवळ नाकारलाच जात नाही.तर निसर्गाने तिला आई होणे हा जो हक्क दिला आहे तो स्रीच्या स्रित्वाचा तिच्या स्री असणार्‍या हक्काचीच येथे पायमल्ली केली जात आहे.

कोठे आहे ती स्री पुरूष समानता कधी निर्माण होणार हि समानता पांढरपेशा वर्गात काहीशी दिसुन येते.त्याला स्री पुरूष समानता म्हणणार का,आजहि ७०ते८० टक्के स्रीया या दारिद्र्यात अज्ञानात आहेत. त्यांचे ते दारिद्र ते अज्ञान आज हि कसे त्यांच्या पदरात पडले आहे.या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी तळागाळातील स्री हक्काचा शोध घेणे गरजेचे आहे.

स्री समानतेच्या लढ्यातील ती प्राथमिकता आहे.आज आम्ही केवळ चार दोन शिकणाऱ्या शिकविणारी नोकरी करणारी यांचाच विचार करतो.मुळाशी जाण्याचा देखील प्रयत्न केला पाहीजे.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक /सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here