क वर्ग दैनिक व साप्ताहिकांचे संपादक मंत्रालया समोर आमरण…!

0
23

क वर्ग दैनिक व साप्ताहिकांचे संपादक मंत्रालया समोर आमरण उपोषणास बसणार अलिबाग :-(डॉ. जयपाल पाटील) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या मोठ्या प्रमाणावर रुपये 199 कोटीच्या जाहिराती प्रसिद्धी प्रकरणातून क वर्गातील लहान वृत्तपत्रे व साप्ताहिके यांना वगळण्यात आले व लहान वृत्तपत्रांचे नुकसान केले. यासाठी क वर्ग आणी साप्ताहिक संपादक येत्या 25 ऑगस्ट पासून मंत्रालयासमोर उपोषणास बसणार अशी नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ मर्यादित फलटणचे अध्यक्ष श्री. रवींद्र बेडकीहाळ यांनी दिली आहे. यामध्ये बेडकिहाळ म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील मोठ्या आणि निवडक मराठी दैनिकांना 4 कोटी रुपयाची तरतूद केली होती. त्यामधून शासनमान्य क वर्गातील दैनिके व साप्ताहिकांना जाणीवपूर्वक डावळले आहे. येत्या 25 ऑगस्ट पर्यंत साप्ताहिक व लघु दैनिकांना पानभर जाहिरात दिली नाही तर संघटनेचे प्रमुख रवींद्र बेडके हर फलटण(वय 81) श्रीकृष्ण शेवडीकर नांदेड (वय 71)श्री. रमेश खोत जालना (वय 75)संपादक श्री. प्रसाद कुलथे, श्री. ईश्वरचंद्र गुप्ता, आंबेजोगाई,श्री. अरुण मोरे जळगाव, श्री. विशाल शहा फलटण, श्री. बाबुराव जगताप फलटण, अँड. रोहित अहिवळे फलटण,श्री. रोहित वारडे, फलटण पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यवतमाळ, व अनेक वयोवृद्ध व तरुण संपादक दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी पासून कधीही मंत्रालयासमोर उपोषणास बसणार आहेत. क वर्ग लघु वृत्तपत्रांवरील हा न्याय दूर झाला नाही तर अशा आपल्या सरकार बद्दल मग नकारात्मक होईल आणि त्याचे गाव पातळीवर छोट्या वृत्तपत्रात उमटतील याची नोंद घेऊन झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे.

Previous articleबारामतीत……दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचे जोरदार स्वागत….
Next articleबहिण भावाचा सण
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here