के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कूल, कसबा बारामती चा १० वा वार्षिक स्नेहसंम्मेल मेळावा संपन्न

0
158

के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कूल, कसबा बारामती चा १० वा वार्षिक स्नेहसंम्मेल मेळावा संपन्न

कारभारी आप्पा चेरिटेबल फाऊंडेशन संचलित के.ए. सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कूल, कसबा, बारामती चा १० वा वार्षिक स्नेहसंम्मेलन मेळावा दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी ग. दि. मा. सभागृह, विद्या प्रतिष्ठान, बारामती याठिकाणी संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री. चंद्रमोहन साळोखे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, बारामती उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे व या शाळेने शैक्षणिक तसेच विविध क्रीडा क्षेत्रात उत्तम दर्जाचे विद्यार्थी खेळाडू तयार करून शाळेचे व बारामतीचे नांवलौकीकात भर पडेल अशी कामगिरी केल्याचे गौरौदगार करून भविष्यातही अशाच प्रकारचे चांगले विद्यार्थी खेळाडू या शाळेतून घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहूण्यांच्या शुभहस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्रीडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आदर्श शिक्षक म्हणून श्री. पंकज लोखंडे सर व सर्वोकृष्ट सेविका (मावशी) सौ. मिनाक्षी गवळी यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. श्री. डी. एस. पवार (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) विद्युत अभियंता, सेन्ट्रल ऑफीस विद्या प्रतिष्ठान व मा. श्री. मोहम्मद शफीक संकेश्वरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश टेक्सटाईल पार्क, धुळे, शाळा समिती अध्यक्ष मा. श्री हनुमंतराव मोहिते (आप्पा) व उपाध्यक्ष मा. श्री. प्रशांत (नाना) सातव, प्राचार्या सौ. सुनिता शेडगे आदी मान्यवर व के.ए. सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कूल चे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी केले, शाळेचा वार्षिक अहवाल प्राचार्या सौ. सुनिता शेडगे यांनी सादर केला, सुत्रसंचालन मनोरमा लोढे, अंजूम कोतवाल व निर्माला निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पल्लवी गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here