केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे…!

0
3

केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे…!

यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार आणि खासदार मा. पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह साहेबांची भेट घेऊन स्व. अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली होती.

विशेष म्हणजे, त्याच भेटीदरम्यान सुनेत्रावहिनी पवार यांनी स्वतः पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना शाह साहेबांना दिली होती आणि त्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती.

स्व. अजितदादांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची या ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. त्याच अनुषंगाने आजची ही पूर्वनियोजित, औपचारिक भेट झाली.

या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील विविध प्रश्न मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही झाली.

मात्र, सुनेत्रावहिनी पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.

काही अदृश्य शक्तींकडून अशा बातम्या पेरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. हा निव्वळ खोडसाळपणा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे.

माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगविणे योग्य नाही.

मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका. पेरलेल्या बातम्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक समजून घ्या!
उमेश पाटीलमुख्य राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ट्विट केले आहे..!

Previous articleहरियाणापर्यंत पळाले, पण शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याच!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here