Homeलेखकुजकेपणा

कुजकेपणा

कुजकेपणा
कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते

       म्हणजेच

कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजे. कुटूंबाच प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ!.
आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायच आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. नाती जपत चला. कारण, आज माणूस एवढा, एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असते. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते. कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते. कोणी वापर करून जाते. तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते!.

घागर भर सुखाला आपण विसरून जातो. चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असत त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणस ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत, नकळत काही तरी शिकवून जाते. काही कस वागायच ते शिकवतात. तर काही कस जगायच ते शिकवतात!.

रोजचा उगवणारा नवा दिवस हा आपल्या मनाप्रमाणे रोजच उगवेल असे नाही. मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसात आपल्या मनासारख काही ना काही निश्चितच ऊगवलेल असेल. एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही. तरी हरकत नाही. मात्र दुसऱ्यांच्या आनंदात अगदी मनपासुन हसतमुखाने सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करावा. तुमचा आनंद आपोआप शतपटीने वाढेल!.

आयुष्यात काहीही असो. स्वकर्तुत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील, आणि इतरांनाही. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी विश्वासाने जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी, सोबत उभी असतील. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार यांची किंमत कवडीमोल असते!.

डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही. आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत. आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक, फार कमी असतात. पण जी असतात ती आयुष्य भरासाठी आपली असतात. नुसतच आपल म्हणून नाही चालत. आपल्यानी आपल्याला मनापासून आपल समजाव लागत. डोळे आणि भावनिक स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात. अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात. यावरून, कळते की ते शब्द जाळणार आहेत, की थंडावा देणार आहेत!.

‼️ अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवु द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊच द्यायचा नाही. ‼️

             राम बिडकर

✧═══❁❁═══✧

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on