कारभारी जिमखाना क्रिकेट संघाची नेत्रदिपक कामगिरी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित स्पर्धेसाठीच्या 19 वर्षाखालील गटातील पात्रता फेरीतील दोन दिवसांचे (2 क्ंले) सामने बारामती येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम बारामती येथे सुरू असून सदर सामन्या अंतर्गत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लब बारामती यांचा सामना पुणे येथील वालेकर क्रिकेट अकॅडमी या संघाबरोबर दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडला.
या सामन्यामध्ये वालेकर क्रिकेट अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना कारभारी जिमखाना संघाने सत्यजित आटोळे(36 धावा), जय दानवले (42 धावा), अर्थव बोराडे (119 धावा), सुर्दशन तोरडमल (33 धावा), आनंद नलवडे (39 धावा) व मणिरत्न गायकवाड (20 धावा) यांचे दमदार फलंदाजीच्या जोरावर 373 धावांचा भलामोठा डोंगर वालेकर क्रिकेट अॅकॅडमी संघासमोर उभा केला. त्याचे प्रतिउत्तरादाखल वालेकर क्रिकेट अॅकॅडमीचा संघ सुर्दशन तोरडमल (8-2-17-3), सक्षम काटे (5-1-19-2), मोहित जाधव (5-1-20-2), सत्यजित आटोळे (3-1-6-2) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे 77 धावांवर गारद झाला त्यास कारभारी जिमखाना संघाने फाॅलो आॅन देत पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यामध्ये रोहन जाधव (10-4-27-5), सक्षम काटे (9-3-16-2), सत्यजित आटोळे (6-1-21-2) यांनी भेदक मारा करीत केवळ 98 धावांवर वालेकर संघाचा धुव्वा उडवित एक डाव व 198 धावांनी दणदणीत विजय मिळवित आपल्या चमकदार कामगिरी पुढे सुरू ठेवली.
याकरीता प्रशिक्षक म्हणुन श्री. सचिन माने, सौरभ दळवी, इम्रान पठाण, हैदर तांबोळी तसेच नितीन सामल, संजय हाडके व विनोद यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ऐतिहासिक विजय मिळविल्यामुळे श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.