एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतंय जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
3

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतंय जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती, दि.१३: जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हुन अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होवून या गावातील पाणी टंचाईकमी होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया-बारामतीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, माळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार स्वप्नील रावडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आयडीबीआयचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष कुमार, फोरमचे सदस्य आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया-बारामतीच्या माध्यमातून मागील १६ वर्षांपासून विविध क्षेत्रात सक्रिय काम सुरु होते. विविध क्षेत्रात ठसा उमटवत बारामतीच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलला आहे.

फोरमच्या माध्यमातून नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ६ हजार नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कर्करोग व्याख्यान आणि तपासणी शिबीर, पर्यावरण जनजागृतीच्यादृष्टीने प्रतिबिंब व्याख्यानमाला, विज्ञान जत्रा, वृक्षारोपण, पाणीवठे निर्मिती, मातीतील खेळ जत्रा, हॅप्पी स्ट्रीट आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बारामती घडविण्याची आपली सामूहिक जबाबदारी कामे आहे. समाजातील सेवाभावी संस्थेने या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीमती पवार म्हणाल्या.

बारामती जेष्ठ नागरिक निवास येथे सीएसआर निधीतील फॅको मशिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सीएसआर निधीतून देण्यात आलेल्या रेडिओग्राफी मशिनचे प्रातिनिधिक स्वरुपात हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी जुन्नर येथील पर्यावरण क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे रमेश आणि स्वाती खरमाळे यांना २०२६ चा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच डॉ. परिक्षित गोगटे, अभिजित चौधर, डॉ. पुरूषोत्तम पवार, डॉ. राधिका शहा- वाघोलीकर आणि जलतरणपटू वरदा कुलकर्णी यांना बारामती आयकॉन-२०२६ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Previous articleउपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला १०१ लॅपटॉपचे हस्तांतरण
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here