एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या बारामती मधील 334 घरांना शासनाकडून मंजूरी

0
181

एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या बारामती मधील 334 घरांना शासनाकडून मंजूरी.

     प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्र.४ (स्वमालकीच्या जागेवर घराची निर्मिती करणे) अंतर्गत बारामती नप हद्दीतील 334 घरकुले मंजूर झाली आहेत. 

    बारामती नगर परिषदेकडून दि. ०१/१०/२०२२ रोजी फेज ५ मध्ये १०५ घरकुले तसेच दि.२४/११/२०२३ रोजी फेज ६ मध्ये २२९  घरकुले असे एकूण ३३४ घरकुले शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. सदर ३३४ घरकुलांना केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. सदर ३३४ घरकुलांना शासनाकडून रुपये ८३५ लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

नागरिकांनी घरकुलाचे काम सुरु करावे व निधी मागणी करावी असे आवाहन नप मार्फत करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here