वार्षिक स्नेहसंमेलन
एकता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये २९ डिसेंबर २०२३ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ७ वीच्या विद्यार्थिनी आयशा शेख ,जोया शेख व शिक्षिकांनी यांनी केले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम एस एज्युकेशन सोसायटी ऑफ महाराष्ट्र चे विज्ञान प्राध्यापक मा. माधव वामनराव जोशी हे होते. कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अल्ताफ सय्यद शाळेचे सचिव श्री परवेज सय्यद , शाळेचे आधारस्तंभ हजी कमरुद्दिन सय्यद , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. भाग्यश्री हिवरकर तसेच शाळेचा सर्व शिक्षकवर्ग व पालक वर्ग उपस्थित होता . व्यवस्थित रित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे नृत्य व गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली . यामुळे प्रेक्षक वर्गातील मुलांचे मनोरंजन झाले. मुले सुध्दा उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद लुटत होती.
अशा प्रकारे कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली .