उद्या १८ ला गदिमा सभागृहात उदघाटन सोहळा ऑनर्स, मायनर आणि पिजी डिप्लोमा कोर्सेसच्या माध्यमातून नोकरीच्या संधी..!

0
198

विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयबीएम आईस या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा जागतिकीकरण व मोठ्या प्रमाणात अवलंबलेले तंत्रज्ञानातील बदल आणि त्याला अनुसरून महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी भारतातील विद्यापीठांना, स्वायत्त संस्थांना आणि प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते.

आज विविध महाविद्यालयात, स्वायत्त संस्थांत आणि विद्यापीठ स्थरावरती धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या लोकांसाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि त्याची गुणात्मक अंमलबजावणी करणे हेच मोठे आव्हान बनले आहे.


या गोष्टींचा विचार करून विद्या प्रतिष्ठानने जागतिक दर्जाच्या आयबीएम कंपनीसोबत सामंजस्य करार करून बहुआयामी आणि पुर्णतः कौशल्य विकासावर भर देण्याऱ्या विषयांमध्ये ऑनर व मायनर डिग्री तसेच पीजी डिप्लोमा कोर्सेस करण्याची उत्तम संधी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे निर्माण करून दिली आहे.

यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सेक्युरिटी या व इतर अनेक विषयांमध्ये आयबीएम ऑनर मायनर तसेच पीजी डिप्लोमा कोर्सेस करता येतील.

आयबीएम ऑनर्स, मायनर आणि पिजी डिप्लोमा कोर्सेसच्या माध्यमातून विकसित झालेल्या कौशल्यावर नोकरीच्या संधी बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.


या संधी विषयी पूर्ण जाणून घेण्यासाठी आणि आपल्या पाल्याचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दि. १८ जुलै २०२३ ला, सकाळी ठीक १०. वाजता, विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयबीएम आईस या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यास जास्ती जास्त विद्यार्थी व पालकवर्गाने उपस्थित राहावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here