इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली संघाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी संतोष शिंदे यांची निवड.

प्रतिनिधी : देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या
इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली संघाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी बारामतीतील साप्ताहिक “भावनगरी” चे संपादक संतोष शिंदे यांची निवड करण्यात आले या निवडीचे पत्र फलटण येथील आयोजित कार्यक्रमात रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यापूर्वी इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष शिंदे यांनी चांगले कामकाज केल्याबद्दल पदोन्नती म्हणून यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्य सचिव पदी बडती देण्यात आली हे सांगण्यात आले महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील अनेक संघटनाच्या विविध संस्थांवर काम केल्याचा त्यांच्या पाठीशी दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना हे महाराष्ट्र राज्याचे सचिवपद मिळाले असल्याचे समाधान तर त्यांचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती अशा कष्टाळू प्रामाणिक निस्वार्थीपणामुळे त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून मित्र परिवारातून सर्वत्र अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे . फलटण येथील आयोजित कार्यक्रमात यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले की
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘ इ रा ‘ च्या पाठिशी सदैव उभे राहणार – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण – आधुनिक समाजात अग्रणी असलेल्या चारही स्तंभाचा दर्जा ढासळला आहे त्यास दुर्दैवाने पत्रकारीता ही बळी पडत आहे. परंतु आशादायक बाब म्हणजे सामाजिक बांधिलकी जपताना काही पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटना प्रामाणिक पणे काम करत आहेत. इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली ने हा वारसा कायम ठेवावा असे सुचक विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथील लक्ष्मी विलास पँलेस येथे आयोजित संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व सत्कार कार्यक्रमा निमित्त ते बोलत होते . इंडियन रिपोर्टर असोसिएशन बद्दल कौतुक करून डॉ. उज्वला शिंदे यांनी दिल्ली मधून गल्लीपर्यंत ईराचे नाव आणल्याबद्दल कौतुक केले. यावेळी आपल्या मनोगत व्यक्त करताना रामराजेंनी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा देऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलनाने करण्यात आले . तुर्कस्तान आणि सीरियामध्ये प्रचंड भूकंपामध्ये जे बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुमार कोटेचा इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी केली . यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार संजय कुमार कोटेचा यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार डॉक्टर उज्वला शिंदे यांच्या हस्ते
करण्यात आला
इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून साप्ताहिक पडसादच्या संपादिका डॉ. उज्वला शिंदे , महाराष्ट्र राज्य सचिव पदी साप्ताहिक भावनगरी चे संपादक संतोष शिंदे यांना ओळखपत्र ,प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र देऊन श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच सातारा जिल्हा अध्यक्षपदी राजकुमार डोंबे , फलटण तालुका अध्यक्षपदी संदीप कदम , सेक्रेटरी पदी सदाशिव मोहिते , उपाध्यक्षपदी विलास इंगळे , माण तालुका अध्यक्षपदी दिलीप कीर्तने , उपाध्यक्षपदी महादेव काटकर , सेक्रेटरी पदी संजय जगताप , माण तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून धवल होरा , समन्वयक पदी उमेश काटकर, खटाव तालुका अध्यक्षपदी विक्रांत येवले , आटपाडी तालुका अध्यक्षपदी महादेव महाडिक , खंडाळा तालुका अध्यक्षपदी निलेश वाळिंबे , दौंड तालुका अध्यक्षपदी निलेश जांभळे इत्यादी मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी डॉ. उज्वला शिंदे , मदनबापू कोल्हे , देवानंद वाकडे , उत्तम धायजे , पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले . ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन महाराष्ट्र सचिव व दैनिक प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे ही उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात इंडियन रिपोर्टर असोसिएशन विषयी व पत्रकारांच्या मागण्याविषयी सविस्तर विषय मांडला. यावेळी कागल येथील द कसबा सांगाव टाइम्स चे प्रकाशन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच द ब्रिलियंट हेल्थ अँड ऍग्रो संस्था यांच्यामार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत फलटण तालुक्यामध्ये दहा हजार वृक्षारोपण करण्यात आले यासाठी इंडियन इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते श्री तात्यासाहेब शिंदे यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक पडसादच्या संपादिका डॉ. उज्वला शिंदे यांनी केले होते . सुत्रसंचालन दिपा निंबाळकर तर आभार संदिप कदम यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास फलटणमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता , स्थैर्य चेेे संपादक प्रसन्र रुद्रभटे , डॉक्टर , वकील , महिला कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी

    हार्दिक अभिनंदन सर जी !
    आपल्या पुढील वाटचालीसाठी मन: पुर्वक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on