आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाण अवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

अवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू - उपमुख्यमंत्री अजित पवार

0
147

आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाण

अवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू
– उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शास्त्रज्ञांसह सर्व भारतीयांचे अभिनंदन.

मुंबई, दि. २:- चंद्रयान-३ च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे भारताचं पहिलं सूर्ययान आज सूर्याच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारतानं आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चंद्रयान आणि आता सूर्ययानाच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आपल्या देशाला अवकाश संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख, वलय, विश्वास मिळवून दिला आहे. यापुढे देखील अनेक अवकाश मोहिमा राबवून देशाच्या, जगाच्या संशोधन क्षेत्राच्या विकासात मोठी भर घालण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भारताच्या या गौरवशाली वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी वैज्ञानिक, तंत्रज्ज्ञ, अभियंता, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त भारतीयांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here