आचार्य अॅकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांची इस्त्रोला प्रेरणादायी भेट
भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राचा कणा असलेल्या इस्त्रो (ISRO) या संस्थेला भेट देण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १७२९ आचार्य अॅकॅडमीने एक अनोखा उपक्रम राबवला. अॅकॅडमीने आयोजित केलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवलेल्या दहा विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची संधी दिली. विशेष म्हणजे या भेटीसाठी विद्यार्थ्यांचा पहिला विमान प्रवास सुद्धा घडवून आणण्यात आला.
इस्त्रो भेटीचे लाभार्थी विद्यार्थी:
प्रथमेश तानाजी पायघन, वेदिका सत्यजीत यादव, अंशुला माणिक जाधव, सोहम विशाल शिंदे, अनुराग महावीर तांबे, तनुजा बालाजी चोपडे, सिद्धी धर्माधिकारी, हर्षवी जिग्नेश डोरजया, शिवराज सिताराम भोसले आणि श्रीहरी अजिनाथ आयुटे हे विद्यार्थी अलीकडेच इस्त्रोच्या प्रेरणादायी सफरीहून परतले.
ही भेट केवळ दृश्य अनुभवापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या विविध विभागांची माहिती, पंतप्रधान बसत असलेल्या विशेष कक्षाला भेट, तसेच यंत्रणा आणि प्रकल्पांची प्रत्यक्ष झलक पाहण्याची संधी मिळाली. अॅकॅडमीच्या रहाटणी शाखेचे प्रमुख प्रतिक पाटील, त्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेली ही भेट पुढील वर्षभरासाठी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरेल.
या विद्यार्थ्यांचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे, संचालक सुमीत सिनगारे, प्रविण ढवळे, आणि कमलाकर टेकवडे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.1729 आचार्य अॅकॅडमी नेहमीच गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहील असे त्यांनी सांगितले
