आचारसंहिता भंगाच्या ६२ तक्रारींवर कार्यवाही

0
23

कॅन्टोन्मेंटमध्ये आचारसंहिता भंगाच्या ६२ तक्रारींवर कार्यवाही

 पुणे,दि. १२ : आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यान्वित असलेल्या ‘सी-व्हिजिल’ कक्षामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान १५ ऑक्टोबरपासून पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये प्राप्त झालेल्या  ६२ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘सी-व्हिजिल’ ॲप वर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफित अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय ॲप मध्ये आहे. या सर्व तक्रारींवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करण्यात आली आहे.

 आचारसंहितेचे उल्लंघन  करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या सीव्हीजील ॲपच्या माध्यमातून नागरिकांना करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे  व या तक्रारींवर अवघ्या १०० मिनिटात कार्यवाही करण्यात येते, अशी माहिती श्री.भंडारे यांनी कळविली आहे

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here