“अम्मी देखो फकीर आया !”

0
145

“अम्मी देखो फकीर आया!”

अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर अल्लाहु,अकबर अल्लाहु अकबर
अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह – पहाटेचा अजानचा स्वर कानी पडला. तशी नगमा नमाज अदा करु लागली.नमाज संपली.
पण नगमाचं मन आज कशातच लागत नव्हतं.
बळंच उठत ती कामास जुंपली.
काम करताना ही तिला तो कालचा प्रसंग आठवला.
ती आणि तिची छोटीशी मुलगी शानो खजूर आणि फळं आणण्यासाठी बाहेर पडली होती.
वाटेत तिला एक फकीर दिसला. फकीराला तिनं काही फळं आणि पैसे दिले आणि म्हणाली,बाबा ईदी लेने घर आ जाना.मैं इंतजार करुंगी!
त्यावर फकीर बोलला,मेरा बच्चा बुखार से तडप रहा है।बच्चा छोटा है।और करोनासे उसकी अम्मी का इंतकाल हुआ है।
मैं आ ही जाऊंगा ए कह नहीं सकता ।
फकीर नजरे आड झाला‌.शानो म्हणाली क्या हुआ अम्मी? आप इतने उदास क्यों हो गए?
कुछ नहीं बेटा बस दुआ करो अल्लाह से कि उस फकीर के नन्हें को जल्दी ठीक करें।
बच्चों की मन्नत अल्लाह जल्दी पूरी करते हैं!
दुपारच्या नमाज मध्ये ही तिनं फकीराच्या मुलाला लवकर बरं कर म्हणून प्रार्थना केली.
दिवस भरात आत बाहेर डोकावत ती फकीराची वाट पहात
राहिली .तिला वाटायचं फकीर आला की मी त्याला खूप काही देईन.फळं, बिर्याणी, खजूर,रोट नवे कपडे.तिनं टेबलवर सगळं काढून ही ठेवलं होतं.
संध्याकाळ सरत चालली.रोजा सोडायला सगळी एकत्र बसली.
पण तिचं कशातच लक्ष नव्हतं.
फकीर का येत नाही? त्याच्या मुलाला बरं तर असेल ना?
बिन मां का बच्चा..या कारणांमुळं ती खरंच व्याकूळ झाली होती.
काय होतं तिचं आणि त्या फकीराचं नातं?माणुसकीचच ना!
पण तिला रमजान मधल्या नमाज वर विश्वास होता.कल्याण करणा-या अल्लाह वर विश्वास होता.
ती पुन्हा अस्वस्थ.
ती उठली.एकदा बाहेर पाहू लागली.दूरदूरवर तिला कोणी दिसेना.
तिचं काळीज चिरत गेलं.ती रडू लागली.फकीराच्या मुलाला काही झालं नाही पाहिजे.मनोमन ती प्रार्थना करु लागली.
तेवढ्यात धावत धावत शानो घरात आली म्हणाली,”आम्मी तुम कहाॅं हो.अम्मीsssअम्मीss देखो फकीर आया!
नगमाला रमजानचे रोजे चा ही विसर पडला.ती धावत धावत बाहेर आली.तिचा सगळा थकवा गेला होता.धापा टाकत ती बोलली
बाबा,अब बच्चा कैसा है?
स्मित करत अल्लाह की दुआ है बहन अब खैरियत है! फकीर म्हणाला.
तिनं त्याला ईदी दिली.खूप दिलं.आणि म्हणाली कल बच्चे को ले आना घर!
फकीरानं नगमा आणि शानोला मोरचन फिरवला.म्हणाला आपकी बच्ची पर कोई मुसिबत नआए.दुआं देऊन फकीर निघून गेला.
एवढ्याशा ईदी मध्ये किती तरी भरभरून दुआं देऊन गेला फकीर.जगण्यातला केवढा मोठा संदर्भ समजावून गेला फकीर.
आपलं बाळ आजारी असताना दुस-यांच्या बाळाला दुआ देणं कसली अफाट श्रीमंती ही?काळजानं श्रीमंत असलेला फक्त नावाचाच कफल्लक फकीर तो!
नगमाची छोट्या शानोची प्रार्थना आज रमजानच्या पवित्र महिन्यात अल्लाह ने ऐकली होती.
रमजान मे मांगी हुई दुआं सच में खाली नहीं जाती!


©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here