अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना “शिवगौरव पुरस्कार” प्रदान…!

0
25

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना “शिवगौरव पुरस्कार” प्रदान

पुणे, दि. २३: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना प्रतिष्ठित “शिवगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. मोदी गणपती चौक येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे सन्माननीय स्वरूपात प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब दाभेकर होते, तर निरंजन दाभेकर, जनमेजय राजे भोसले, अंकुश काकडे, संदीप खर्डेकर, विवेक खटावकर, संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सचिन गोवेकर, दत्ता सागरे, अनिल येनपुरे आणि तेजस्विनी दाभेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना प्राजक्ता माळी यांनी आपल्या भावना व्यक्त करत महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाल्याचे समाधानकारक असल्याचे सांगितले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात याच मंचाने आपल्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले आणि गेल्या ४७ वर्षांपासून सातत्याने हा उत्सव साजरा करणाऱ्या बाळासाहेब दाभेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

कलाजगतातील योगदानासाठी प्रतिष्ठित सन्मान

प्राजक्ता माळी यांचे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या अभिनयाची, कलेप्रती असलेल्या निष्ठेची आणि समाजातील सकारात्मक भूमिकेची दखल घेत “शिवगौरव पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

छायाचित्र: प्राजक्ता माळी यांना शिवगौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here