अजित पवार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आणखी एक अध्याय!
बारामती आणि परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी
पुणे आणि बीड जिल्ह्यांना मोठी भेट देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे महिन्याभरातच बारामती आणि परळी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुपालकांना अत्याधुनिक सेवा मिळणार असून, प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास मदत होईल. अजितदादांच्या झपाट्याने काम करण्याच्या शैलीमुळे, जानेवारी 2025 मध्ये ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात दिलेली घोषणा अवघ्या महिनाभरात प्रत्यक्षात उतरली आहे.
शेती आणि पशुपालन क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून 1129 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यामुळे महाराष्ट्रातील पशुधन संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. बारामती व परळी परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांनी सरकारच्या या तातडीच्या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
अजित पवार यांच्या वेगवान निर्णयक्षमतेने महाराष्ट्राच्या विकासाचा अजून एक मैलाचा दगड उभा राहिला आहे!
