HomeUncategorizedअजित पवार.. चं.. भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय….!

अजित पवार.. चं.. भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय….!

खरे आहे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली…! प्रतिनिधी : होय काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्वतः अजित दादा उपमुख्यमंत्री पदी तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील व अन्य राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपद मिळाले. मात्र बारामती तर काही तासानंतर कुठे गम कुठे खुशी चे वातावरण पाहायला मिळाले तोपर्यंत बारामतीकर शांत होते जोपर्यंत शरद पवार आपल्या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते तर काहींच्या हृदयाचे ठोके सुरू होते . ……काय होते काय झाले दादांनी विचार पूर्ण निर्णय घेतला आला असेल असे काही बारामतीकरांतून बोलले जात होते तसे वाटले. राष्ट्रवादीसोबत आहे का साहेबांचा निर्णय आहे का का दादांनी निर्णय घेतले यावर चौका चौकात चर्चा होती. आणि काहीही झाले तरी अजितदादा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे बारामतीचा जो काही रखडलेला विकास पॅटर्न परत नव्या जोमाने सुरू होईल यासाठी बारामतीकरांच्या हृदयात मात्र अनेकांच्या मनात ऊखळ्या पुटपुटत होत्या. तर अखेर अजित दादा यांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली यावर तरुणाई मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला तरी कशाप्रकारे नाट्यमय्यरीत्या.. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत . काही दिवसापूर्वी सुरू असलेली अजित पवार यांची भाजपामध्ये जाण्याची धूस्पूस तर मंत्रीपद मिळणार हे उमजले असतानाच.. अजितदादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्वतः उपमुख्यमंत्री तर काहींनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय माजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले प्रफुल्ल पटेल , छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धर्मराव आत्राम धनंजय मुंडे नरहरी शिरवळ हसन मुश्रीफ सुनील शेळके आदित्य तटकरे.. राष्ट्रवादीतीलआघाडी नेते शपथविधीला प्रामुख्याने दिसले. यामध्ये काहींनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली. अजितदादा यांच्यासोबत कोण कोण – छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, धर्मराव आत्राम ,अनिल पाटील , आदित्य तटकरे ,हसन मुश्रीफ, सुनील शेळके, संग्राम जगताप ,चेतन तुपे, दिलीप बनकर ,नितीन पवार, अण्णा बनसोडे, राजेंद्र कारेमोरे, राजेश नरसिंग पाटील, दिलीप मोहिते ,चंद्रकांत नवघरे, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे, दिलीप चव्हाण, नरहरी शिरवळ ,अतुल बेनके, संजय बनसोडे, सरोज आहेर ,मनोहर चंद्रिकापुरे.. आधी आमदार अजित दादांच्या बरोबर असल्याचे बोलले जात आहे..! शरद पवार यांच्याबरोबर….. कोण कोण…- जयंत पाटील जितेंद्र आव्हाड प्राजक्ता तनपुरे बाळासाहेब पाटील रोहित पवार सुनील भुसार व अजून काही तळ्यात कि मळ्यात हे स्पष्ट होईल म्हणजेच अजित पवार यांच्याबरोबर की शरद पवार यांच्याबरोबर हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच…! असे होईल का….! न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या न्यायालयात खंडपीठाच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची याचिका सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाऊ शकते..? तर भाजपाने हेच ओळखल्यामुळे पुढील नियोजनात्मक, सकारात्मक ,राजनीती करत उद्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार असतील काय असे भाजपचे षडयंत्र वाटते आहे. तर 10 ऑगस्टपर्यंत वाट पाहू …महाराष्ट्र मुख्यमंत्री बदल अटळ..? एकनाथ शिंदे हे आता काही दिवसाचे मुख्यमंत्री पदावर पाहुणे आहेत. संजय राऊत असेही आज म्हणाले आहेत.. असे अंदाज वर्तविले जात

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on