अजितदादा पवार यांच्यामुळेच बारामती एमआयडीसीचा विकास – धनंजय जामदार

0
22

अजितदादा पवार यांच्यामुळेच बारामती एमआयडीसीचा विकास – धनंजय जामदार

पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील एक आदर्श उद्योगनगरी म्हणून बारामती एमआयडीसीचा नावलौकिक आहे. या औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास केवळ अजितदादा पवार यांच्यामुळेच झाला आहे. दादांच्या अकाली निधनाने बारामती औद्योगिक क्षेत्र पोरके झाले आहे अशी भावना बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केली.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने बारामती एमआयडीसी विश्रामगृहाच्या आवारात शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, भारत फोर्जचे प्रकल्प प्रमुख संजय अग्रवाल, मनुष्यबळ विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट सदाशिव पाटील, सेन्वियॉन विंड टेक्नोलॉजीचे प्रकल्प प्रमुख विजय महाजन, जीटीएन इंजीनियरिंगचे प्रकल्प प्रमुख उद्धव मिश्रा, रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे, वेरीटजचे प्रमुख दिलीप भापकर, समर्थ उद्योग समूहाचे प्रमुख हरीश कुंभारकर, श्रीनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संभाजी माने, भारत मोकाशी,कॉटोंकिंगचे उपाध्यक्ष खंडू गायकवाड, डायनॅमिक्सचे मनुष्यबळ अधिकारी मुकेश चव्हाण, मयुरेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख शशिकांत चौधर, पियाजियो मनुष्यबळाचे प्रमुख किरण चौधरी, स्काय ॲग्रोचे संचालक केतन भोंगळे, धनलक्ष्मी उद्योगाच्या शीला मोहिते,डॉ जगदीश शिंदें, स्टार इन्शुरन्स च्या मीरा जाधव आदींनी मनोगत व्यक्त करून अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बारामती औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजितदादा यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती औद्योगिक क्षेत्राला अखंडित वीज व पाणीपुरवठा, उत्तम कायदा व सुव्यवस्था, आवश्यक पायाभूत सुविधा , अत्याधुनिक उपचार सुविधा देणारे शासकीय रुग्णालय, प्रस्तावित ईआयसी हॉस्पिटल, उद्योगांच्या सोयीसाठी बारामतीमध्येच स्वतंत्र एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय अशा असंख्य सुविधा उद्योगांसाठी अजित दादांनी उपलब्ध करून दिल्याची भावना उपस्थित उद्योजक व कंपनी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, राजन नायर, सदाशिव पाटील, खंडूजी गायकवाड, हरिष कुंभारकर आदी पदाधिकाऱ्यांनी या शोकसभेचे आयोजन केले.तर शेवटला पसायदान ने सांगता झाली. यावेळी बारामतीतील उद्योजक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here