अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
2

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बारामती, दि. 21 जून : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बारामती शाखेच्या वतीने दहावी, बारावी तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पुरंदरे उपस्थित होते. तसेच श्री. उदय रानडे आणि श्री. अश्विनीकुमार पत्की यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील संधींबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अनुप्रिता डांगे यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.
महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी विशेष आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका अध्यक्ष श्री. जगदीश देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महिला अध्यक्षा सौ. मेधा पळशीकर यांनी प्रास्ताविक करताना युवाशक्तीने संघटनेशी जोडले जावे आणि संघटना वृद्धिंगत करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.


यावेळी संघटनेच्या नवीन पदांसाठी नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अष्टपुत्रे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. किशोरकुमार जोशी, सौ. सारिका इंगळे, सौ. विद्या भोयरेकर, सौ. अश्विनी जोशी, श्री. केदार सुभेदार, सौ. पल्लवी अभ्यंकर, सौ. योगिता कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleमाझी विद्यार्थ्यांची चळवळ; पुनर्जीवित झाली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here