हरहुन्नरी, जिद्दी आणि फिटनेसप्रेमी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

0
38

हरहुन्नरी, जिद्दी आणि फिटनेसप्रेमी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

(संतोष शिंदे संपादक भावनगरी 9822730108)

बारामतीच्या भूमीत आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने वेगळी ओळख निर्माण करणारे श्री. राजेंद्र लक्ष्मण ठवरे यांचा आज वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावनगरी व शिंदे परिवाराकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र पोलीस सेवेत उल्लेखनीय कार्य करत स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरही ठवरे साहेबांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि फिटनेसप्रेमातून अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांनी आयर्न मॅन कझाकिस्तान, कोल्हापूर हाफ आयर्न मॅन, 100 किलोमीटर अल्ट्रा रन, 78 किलोमीटर ट्रेन रन यांसारखी आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.


याशिवाय त्यांनी जवळपास दीडशेहून अधिक अल्ट्रा रन आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून एक वेगळाच विक्रम उभा केला आहे. त्यांच्या साहसी वृत्तीचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी तब्बल ४,१०० किलोमीटरचा सायकल प्रवास. गड-किल्ल्यांची सायकलस्वारी, विविध सायकल स्पर्धांमधील सहभाग आणि सातत्यपूर्ण व्यायाम यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
ठवरे साहेबांचा मित्रपरिवारही मोठा असून त्यांच्या मेहनतीचा, व्यायामावरील प्रेमाचा आणि जिद्दीचा आदर व्यक्त करत आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. अनेक तरुणांना व्यायाम, धावणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देणारे ते बारामतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या या आरोग्यप्रेमी प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. सोनाली ठवरे यांचीही मोलाची साथ आहे. त्या एक यशस्वी योगशिक्षिका आणि गृहिणी असून बारामतीतील नक्षत्र गार्डन येथे महिलांसाठी नियमित योग प्रशिक्षण वर्ग घेतात. या दाम्पत्याने आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश समाजात सातत्याने पोहोचवला आहे.


नक्षत्र गार्डन परिवार, बारामतीतील मित्रपरिवार तसेच सर्व चाहत्यांकडून या प्रेरणादायी दाम्पत्याला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
श्री. राजेंद्र लक्ष्मण ठवरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपले पुढील आयुष्यही असेच उत्साही, निरोगी आणि प्रेरणादायी राहो ही सदिच्छा!
– भावनगरी व शिंदे परिवार, तसेच मित्रपरिवार, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here