साप्ताहिक भावनगरी दिवाळी अंकाचे प्रकाशन शरद पवार साहेबांच्या हस्ते
आज दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी बारामतीतील गोविंद बाग येथील निवासस्थानी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते साप्ताहिक भावनगरीच्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी पवार साहेबांनी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.
कार्यक्रमादरम्यान, साप्ताहिक भावनगरीच्या गेल्या १६ वर्षांच्या प्रवासाची माहिती साहेबांना सांगण्यात आली. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जाहिरातदार, हितचिंतक आणि मित्रपरिवार यांच्या मदतीने हे साप्ताहिक अनेक अडचणींवर मात करून सातत्याने प्रकाशित करण्यात आले. नोटाबंदी आणि कोरोनाकाळात काही अडथळे निर्माण झाले तरीही या अंकाने आपली ओळख कायम ठेवली आहे. साप्ताहिकाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे (वेबसाईट, फेसबुक पेज, यूट्यूब) नियमित कार्य चालू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पवार साहेबांसोबत जुने किस्से आणि आठवणी शेअर करण्यात आल्या. तसेच, विविध संघटनांतील कार्याचा आढावा दिला गेला. पवार साहेबांनी साप्ताहिक भावनगरीच्या कामगिरीचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.