सर्वोच्च न्यायालयातून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल….याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष….!

0
187

सर्वोच्च न्यायालयातून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल….
याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष….!

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लागण्याची शक्यता?

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कायद्याप्रमाणे व उद्धव ठाकरे यांच्या वकीलांनी केलेल्यां युक्तीवादावरून व दाखल केलेल्या पुराव्यांनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लागण्याची शक्यता? एक अभ्यासपूर्ण अंदाज! शेवटी निकाल देण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच!
राज्यातील सत्ता संघर्षाचा नऊ महिन्यापासून चालू असलेला युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही पक्षाच्या वतीने संपुष्टात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला
राज्यातील सत्ता संघर्षाचा नऊ महिन्यापासून चालू असलेला युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही पक्षाच्या वतीने संपुष्टात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचे लक्ष ह्या निकालाकडे लागले आहे!घडलेल्या घटना कायदे नियम पाहिले असता त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी कायदेशीर केलेला युक्तिवाद दाखल केलेले पुरावे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलेले मत या सर्व घडामोडीवरून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडूनच लागायला पाहिजे
परंतु मुख्य निवडणूक आयोगाच्या निकालाप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टावर दबाव येऊ शकत नाही परंतु अपवादात्मक परिस्थितीत दबाव आला तर? सन २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कुठलाही धोका नाही आणि नियम कायदा याप्रमाणे व उद्धव ठाकरे यांच्या वतीने दाखल केलेले पुरावे व उद्धव ठाकरे यांच्या वकीलांनी सुनावनीत केलेला कायदेशीर युक्तिवाद यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांचा विजय कोणीही रोखू शकणार नाही! देशात व राज्यात लोकशाही जिवंत आहे आणि यापुढेही देशातील व राज्यातील लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज माननीय सर्वोच्च न्यायालयावर येऊन पडली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायद्यानुसार निकाल दिला तर देशातील लोकशाही आणखीन मजबूत होईल याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय चुकीचे निर्णय देते असाअर्थ घेऊ नाही परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाणाचा आश्चर्यकारक व बेकायदेशीर निकाल एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्यामुळे देशातील व राज्यातील लोकांच्या स्वायत्त संस्थावरील विश्वास उडत चालला आहे हा गैरविश्वास माननीय सर्वोच्च न्यायालयाबाबत होऊ नये हीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे कायदेशीर निकाल हा भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ऐतिहासिक निकाल होईल! शिवसेना फोडून ३४ फुटीर लोकांच्या पत्रावर माननीय तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांनी सत्ता बदलली ही घटना अतिशय भयंकर आहे राज्यातील व देशातील सदसद विवेक बुद्धीजागृत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सदर घटना पटली नाही एवढेच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा श्री धनंजय चंद्रचूड यांना देखील पटले नाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आपली खंत जाहीर केली त्याचप्रमाणे पक्षांतर विरोधी कायद्याच्या दहाव्या परिशिष्टातील कलमानुसार ते चुकीच आहे असे देखील कायदे तज्ञांचे मत आहे उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षातील सरकार च्या कामगिरीबद्दल त्यांच्या *शिवसेनेतील किंवा आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर घटक पक्ष किंवा अपक्ष वगैरे पक्षातील एकाही सदस्यांची म्हणजे आमदाराची व मंत्र्याची कोणतीही तक्रार राज्यपालाकडे नव्हती मग एकनाथ शिंदे व 34आमदारांनी दिलेले पत्र व त्यातील मजकूर गृहीत धरून सत्ता बदलण्याचे राज्यपालास काही ठोस कारणही नव्हते व घेणे देणेही नव्हते तसा अधिकारही नव्हता राज्यपाल नेहमी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता बनवण्याचे निमंत्रण देत असतात असा नियम कायदा आहे मग राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता बनविण्याचे निमंत्रण द्यायला पाहिजे होते एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात ३४ आमदाराच्या पत्रावर एकच छोट्या शिंदेगटाला बहुमत चाचणीची परवानगी देऊन सत्ता बदल कसा होवू दिला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे या सर्व गोष्टी कायद्याच्या निकसावर चुकीच्या ठरल्या आहेत त्यामुळे निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनच लागायला पाहिजे परंतु निर्णय घेण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाला आहे!पाहूया काय होते? कारण की तसे पहाता माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचे लक्ष ह्या निकालाकडे लागले आहे!घडलेल्या घटना कायदे नियम पाहिले असता त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी कायदेशीर केलेला युक्तिवाद दाखल केलेले पुरावे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलेले मत या सर्व घडामोडीवरून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकालच तसेच
सर्वोच्च न्यायालयातून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल….
याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष…. लागून राहिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here