‘सन्मान स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमात महिला उद्योजिकांचा गौरव
बारामती (१२ मार्च) — अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा बारामतीच्या वतीने जेष्ठ नागरिक संघ हॉल, बारामती येथे महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.
महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत होईल आणि नवीन प्रेरणा मिळेल, असे महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा सौ. मेधा पळशीकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय महिला आघाडी उपाध्यक्षा सौ. मोहिनी ठोंबरे यांनी केला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. केतकी ताई कुलकर्णी आणि उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई घाटे या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या भोईरेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बारामती शाखेतील महिला आघाडीच्या सौ. अरुंधती खंडागळे, सौ. जयश्री दाते, सौ. स्वाती कुलकर्णी, सौ. वृषाली गरगटे, सौ. सारिका इंगळे यांच्यासह पुरुष पदाधिकारी M.W. जोशी सर, तालुका अध्यक्ष श्री केदार सुभेदार, अविनाश कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाने महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

