श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक मानवंदना
*भरत नाट्यमंदिर, सदाशिव पेठ, पुणे येथे २३ मार्च ,२०२५ रोजी पुण्यश्लोक ऐतिहासिक महानाट्य सादर होणार*
दि. २२ मार्च. पुणे श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले आहे. पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्य भरत नाट्य मंदिर सदाशिव पेठ पुणे येथे दिनांक २३ मार्च, २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता करण्यात येणार आहे. श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून श्री विकास खारगे मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री राम शिंदे सभापती विधान परिषद व ॲड. आशिष शेलार मा. मंत्री सांस्कृतिक कार्य तसेच इतर लोकप्रतिनीधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या ऐतिहासिक महानाट्य पुण्यश्लोक या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
