सौ.स्वातीताई चव्हाण, श्री.अजय महाडिक यांना ‘राष्ट्रीय विधायक संमेलना’च्या रिपोर्टचे वितरण.
1.’एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ चे प्रणेते व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे संस्थापक श्री. राहुलजी कराड यांच्या विचार चिंतनातून मुंबईत 15 जून ते 17 जून 23 या तीन दिवशीय कालावधीत अतिशय भव्य स्वरूपात ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ आयोजित करण्यात आले.
2.’राष्ट्रीय विधायक संमेलना’त देशातील सर्व पक्षांचे 3300 विद्यमान आमदार सहभागी झाले व त्यांनी ‘ एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ च्या अराजकीय मंचावर शाश्वत राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यासाठी विचार मंथन केले.
3.’राष्ट्रीय विधायक संमेलना’च्या यशस्वी आयोजनानंतर या आयोजनाचा अभ्यासपूर्ण रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला.
4.’राष्ट्रीय विधायक संमेलना’चा प्रेरक आणि मार्गदर्शक रिपोर्ट अभ्यासण्यासाठी ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या महाराष्ट्र राज्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहे.
5.’राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, सहसमन्वयक श्री प्रकाशराव महाले व पुणे विभाग महिला समन्वयक श्रीमती भक्तीताई जाधव यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाचा दौरा केला. दौऱ्यात सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.विक्रमसिंह जाधव, सातारा जिल्हा महिला समन्वयक
सौ.स्वातीताई चव्हाण व रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री.अजय महाडिक यांना ‘राष्ट्रीय विधायक संमेलना’चा रिपोर्ट प्रत्यक्ष देण्यात आला.