शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजितदादा पवार यांची जयंती साजरी..!
शिरपूर : शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरपूर येथील कृषी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरपूर तालुकाध्यक्ष श्री. बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. कैलास गोपाळ, पक्षाचे उपाध्यक्ष श्री. सुधीर चव्हाण तसेच कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




