शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेऊन संक्रांत आणि साऊजिजाऊ, फातिमाबी जयंती साजरी….!

0
34

करमाळा :प्रतिनिधी:-

शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेऊन संक्रांत आणि साऊजिजाऊ, फातिमाबी जयंती साजरी
ओम महिला कला ,क्रीडा सांस्कृतिक, सामा.साहित्यिक मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेऊन संक्रांतसण आणि साऊ जिजाऊ जयंती कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा येथे साजरी करण्यात आली.
ओम महिला मंडळ हे करमाळ्यातील जेष्ठ मंडळ असून त्यांचे सामाजिक काम खरंच भरीव आणि कौतुकास्पद असून एखादा मोठा पुरस्कार ही यांच्या सामाजिक कार्यापुढे फिका पडेल असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.सुनिल जाधव सर यांनी मांडले.ओम महिला मंडळाच्या कार्यासाठी आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका सदैव आपल्या सोबत आहोत असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव यांनी केले.
आज साऊजिजाऊ फातिमा बी जयंती तसेच संक्रांतीचा सण याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जगताप विद्यालयातील इ.५ वी तील कु.तनिष्का महाडिक ही विद्यार्थ्यांनी इ १० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन संक्रांतसणाचे छोटेसे हे शैक्षणिक वाण आम्ही देत आहोत.आज ३९ वी मुलगी आम्ही दत्तक घेत आहोत.
शिक्षणासाठी मुलींची कुठलीच गैरसोय होऊ नये हा सावित्रीबाईंचा वसा आम्ही पुढे चालवत आहोत असे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या अंजली राठोड श्रीवास्तव यांनी केले.


मा.भस्मे सर,जयश्री वीर, शहेनाज मोमीन, ज्योती पांढरे, डॉ कविता कांबळे, सुनिता यादव इ.सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रेशमा जाधव, उषा बलदोटा जयश्री लुणीया, लक्ष्मी कटारिया, पल्लवी निंबाळकर यांनी स्वागत गीत सादर केले.
सूत्रसंचालन पुष्पा लु़ंकड व शिक्षिका गुरव मॅडम यांनी केले.
आभार सुवर्णा लुणीया यांनी मानले.
, धनश्री दळवी,अलका यादव, मितवा श्रीवास्तव यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक- शिक्षिका तसेच कु.महाडिक हिचे पालक म्हणून मा.रेणुका राऊत ही उपस्थित होत्या.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

“ओममहिला मंडळाची मी आभारी आहे.मी अगदी मनापासून अभ्यास करून आईबाबा, शाळा,आणि या मंडळाचे नाव उज्ज्वल करेन असे मत कु.तनिष्का महाडिक हिने व्यक्त केले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here