


“शक्ती अभियान” – महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन
बारामती पोलीस उपविभागाने सुरू केलेला “शक्ती अभियान” हा एक व्यापक उपक्रम आहे, जो महिलांच्या सन्मानासाठी, बालकांच्या संरक्षणासाठी आणि युवकांचे प्रबोधन करण्यासाठी राबवला जात आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, बालगुन्हेगारीला आळा घालणे आणि युवकांना सकारात्मक वळणावर नेणे आहे.

अभियानाची वैशिष्ट्ये
- ‘शक्तीबॉक्स’ (तक्रारपेटी):
महिलांना किंवा मुलींना जर तक्रारी करण्यास अडचण होत असेल किंवा ते घाबरत असतील, तर त्यांना या पेटीत गोपनीयपणे तक्रार करता येईल.
स्थापनेसाठी ठिकाणे: शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एस.टी. स्टँड, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृहे, पोस्ट ऑफिस इत्यादी.

बॉक्समधील तक्रारी पोलीस दर २-३ दिवसांनी उघडून योग्य ती कारवाई करतील.
- शक्तीनंबर:
24/7 उपलब्ध 9209394917 या क्रमांकावर तक्रारींसाठी कॉल किंवा मेसेज करता येईल.

गोपनीयता पाळली जाईल, आणि तक्रारींचे त्वरित निराकरण केले जाईल.
- ‘शक्तीकक्ष’:
प्रत्येक पोलीस ठाण्यात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ‘शक्तीकक्ष’ स्थापन करण्यात येईल.

कक्षामध्ये महिलांसाठी समुपदेशन, कायद्याचे मार्गदर्शन आणि विश्वासाने संवाद साधण्याची सुविधा असेल.
- शक्तीनजर:

सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या संशयास्पद फोटो, व्हिडिओ यावर लक्ष ठेवले जाईल.
अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल.
- शक्तीभेट:
शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल इ. ठिकाणी भेट देऊन महिलांना Good Touch, Bad Touch, व्यसनाधीनता, बालगुन्हेगारी, तसेच महिलांवरील कायद्यांबाबत मार्गदर्शन केले जाईल.

विशेष पेट्रोलिंगसाठी उपाययोजना राबवली जाईल.
- शक्तीव्याख्याने:
शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करून युवकांना व्यसन आणि गुन्हेगारीपासून परावृत्त करणे.

महिलांमध्ये कायद्याविषयक जागरूकता निर्माण करणे.
उपाययोजना
संवेदनशील ठिकाणी पोलीसांचा वावर वाढवणे आणि हॉटस्पॉट्स तयार करणे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी पोलीस पाटील, सरपंच, बचत गटांच्या बैठका आयोजित करून जागरूकता वाढवणे.
शाळा व महाविद्यालयाच्या सुट्टीच्या वेळेस परिसरात देखरेख ठेवून विद्यार्थीनींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणे.
अभियानाचा उद्देश

या अभियानाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित, आत्मविश्वासाने भरलेले आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व स्तरांवर कायद्याचे पालन, महिलांच्या सन्मानासाठी प्रयत्न, आणि युवकांचे प्रबोधन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस यंत्रणा कटीबद्ध आहे.
“शक्ती अभियान” हा समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

महाराष्ट्र
उपक्रम-बारामती पोलीस ‘महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन’
उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांचे कार्यालय बारामती उपविभाग, बारामती, जि. पुणे दुरध्वनी क्रमांक
(०२११२) २२३६३०
” शक्ती अभियान”
उपक्रम-बारामती पोलीस ‘महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन’
- अभियानाची वैशिष्ठे :-
▶ ‘शक्तीबॉक्स’ (तकारपेटी):- अनेक महिला/मुलींना अडचणींबाबत (उदा. मुलांकडुन
होणारा पाठलाग, छेडछाड इ. तक्रारीबाबत) मनमोकाळेपणाने व्यक्त होता येत नाही. अथवा ज्या महिला/मुली सदर बाबत तकार करण्यास, सांगण्यास घाबरतात. त्यांनी आपली तक्रार मांडावी. याकरीता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एस.टी.स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलीसांमार्फत ‘शक्तीबॉक्स’ (तकारपेटी) ठेवण्यात येतील. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तु आढळल्यास तसेच अवैध गांजा, गुटखा इ. चा साठा याबाबतची गोपनिय माहिती तकार पेटीत टाकल्यानंतर पोलीसांमार्फत दर २ ते ३ दिवसांनी सदर तक्रारपेटी उघडुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधीतांचे नाव गोपनिय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल.
:- शक्तीनंबर-एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह
9209394917 हा क्रमांकांची सेवा ही
२४/७ सुरू ठेवण्यात येणार असुन त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारींचे त्वरीत निराकरण करणेबाबत व त्यावर योग्य योग्य ती कारवाई करणेबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधीतांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा, कॉलेज, सरकारी/खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पीटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावुन त्याद्वारे प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखादया ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळुन आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडीओ तसेच लोकेशन सदर नंबरवर शेअर केल्यास तात्काळ संबंधीतांना मदत पुरविण्यात येई
शक्तीकक्ष :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला
अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार , उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील ,महिला पोलिस कॉन्स्टेबल वनिता कदम, प्रणाली भोसले, शुभांगी भोसले, रेणुका साळवे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण अभंग शक्ती कक्ष कार्यरत आहे
‘शक्तीकक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देवुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचे अडचणींचे निराकरण करणे तसेच समुपदेशन करून त्यांना कायदेविषक मार्गदर्शन करणे तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणे.
शक्तीनजर :- सोशल मिडीया त्यामध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम याावर अल्पवयीन / किशोरवयीन मुले / मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदुक, पिस्तुल, चाकु अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबतचे फोटो/पोस्ट टाकतात. त्यावर सदर पथकाची नजर असणार असुन असे प्रकार आढळुन आल्यास तात्काळ कडक कारवाई करणे.
शक्तीभेटः- शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एस.टी.स्टँड,
कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देवुन तेथील महिला/मुलींना महिलांविषयक कायदे, Good Touch, Bad Touch व्यसनाधिनता, वाढती बालगुन्हेगारी इ. बाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे. तसेच त्यांचेशी सुसंवाद साधुन त्यांचे लैगींक, शाररीक तसेच मानसिक छळापासुन संरक्षण करून त्यांचेत सदर बाबत जागरूकता निर्माण करणे. सदर सदर ठिकाणी विशेष पेट्रोलींग नेमुन त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक / कायदेविषयक / महिलांविषयीचे कायदयांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले/मुली, युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासुन परावृत करून त्याचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देवुन बालगुन्हेगारी व महिला/मुलींवरील अत्याचारास प्रतिबंध करणे. तसेच महिला व मुलींमध्ये कायदयांविषयक जागरूकता निर्माण करणे. तसेच सदर पथकास पुरविण्यात आलेल्या वाहनातुन पेट्रोलिंग करून तसेच एस.टी. बस/रिक्षा इ. मधून साध्या वेषात प्रवास करून महिला / मुलींची छेडछाड करणारे इसमांवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे. संवेदनशिल ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलीसांचा वावर वाढवुन महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे. ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील, सरपंच, बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेवुन त्यांना महिलांविषयक कादयाची माहिती देणे. शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार वावर आढळुन आल्यास त्यांचेवर तात्काळ योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांकडुन विद्यार्थिनीना विनाकारण त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेणे.