विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. शशांक जळक सर, पत्रकार तैनुरभाई शेख व विपुल आण्णा ढवाण पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…!
मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून, भेटवस्तू देऊन वाढदिवसाचा आनंद द्विगुणित; कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!
विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. शशांक जी. जळक सर, पत्रकार तैनुरभाई शेख आणि विपुल आण्णा ढवाण पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मिक्सर व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे छायाचित्र भेट देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अन्नदाता तथा मा. सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी भूषविले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या सोहळ्यामुळे कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण, भावनिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. आपुलकी, मैत्री आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे, सूत्रसंचालक सलीम भाई सय्यद, फोटोग्राफर प्रशांतमामा कुचेकर, चैतन्य मेडिकलचे सर्वेसर्वा रोहन भैय्या भोसले, कार्याध्यक्ष नरेंद्रभाऊ मिसाळ, मेंबर विठ्ठलशेठ आगवणे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले (फौजी), विष्णुपंत चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा वाढदिवस सोहळा आनंददायी व संस्मरणीय ठरला. अशा उपक्रमांमधून सामाजिक एकोपा, परस्पर स्नेह आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.
विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




