विद्यार्थ्यांनी कठोर मेहनतीने अधिक यश प्राप्त करावे….गजाननराव देशमुख

0
181

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २२ व्या विचारमंथनात विद्यार्थी व मान्यवर सत्कार

बिहार रेल्वे अपघातातील मृत व अकोल्यातील पत्रकार कन्या,अक्षय भालेराव आणि प्रा.रणजीत इंगळे यांना श्रध्दांजली

अकोला– माध्यमिक शालांत आणि स्पर्धा परिक्षेत १०० टक्क्यांच्या आसपास गुणवत्ता प्राप्त झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचा येथे सन्मान झाला,त्यांनी मिळविलेले नेत्रदिपक यश हे त्यांचे आई वडील आणि परिवाराप्रमाणेच समाजासाठी सुध्दा अभिमानास्पद आहे.त्यांनी जीवनात अधिक कठोर मेहनत करून स्वतःसोबतच सामाजिक योगदानासाठी पुढे यावे असे प्रतिपादन मंत्रालयातील शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अव्वर सचिव श्री गजाननराव देशमुख यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या २२ व्या विचारमंथन मेळाव्यात ते विशेष प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी त्यांनी पत्रकार महासंघाच्या पत्रकार कल्याण व विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून व्यापक संघटन आणि कार्यासाठी पत्रकार महासंघाला तथा विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. दहावी व स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त सभासद पाल्ल्यांच्या यशाचे कौतुक आणि शुभेच्छा म्हणून प्रथम स्कूल बॅग,सन्मान पत्र व ज्योतिबा पुस्तक आणि पूष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये जिल्ह्यातून प्रथम आलेली कु.गौरी प्रशांत साबळे,आकांक्षा नितीन अग्रवाल,श्रेया योगेश साहू व कु.दिव्या विजय काटे यांना सन्मानित करण्यात आले. माजी रणजी क्रिकेटपटू श्री संतोषबाप्पू देशमुख यांची महाराष्ट्रातून रेल कामगार सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .सहा.धर्मदाय विभागाचे श्री अनुप देशमुख व बाळापूर पुरवठा निरीक्षक श्री मोहन कोल्हे यांचेही स्वागत करण्यात आहे.

   अकोल्यात जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी डॉ.श्री मिलींद दुसाने व दमाणी नेत्र रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सभापती शुक्ल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर केन्द्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदिपजी खाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

   याप्रसंगी नियमित शिरस्त्याप्रमाणे सर्वप्रथम पत्रकार महासंघाच्या सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण आणि वंदन करण्यात आले.त्यानंतर बिहार रेल्वे अपघातातील मृत प्रवासी, मुंबईत अत्त्याचार आणि हत्त्या झालेली अकोला येथील पत्रकार कन्या, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव व अकोल्यातील प्रा.रणजित इंगळे या हल्ल्यात बळी पडलेल्या मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  यावेळी उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदिप खाडे यांनी प्रास्ताविकातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विस्तार,त्यात लहान पत्रकारांसोबतच 

दाखल होत असलेले ज्येष्ठ दिग्गज पत्रकार आणि उपक्रमांमधील सक्रियतेची माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ.श्री.मिलींद दुसाने आणि श्री सभापती शुक्ल यांनी सुध्दा मनोगतातून पत्रकार महासंघाच्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात पत्रकार महासंघाकडून कोरोना काळातही आणि शिबिरांच्या माध्यमातून गरीबांसाठी सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.मोतीबिंदूप्रमाणेच ईतर आरोग्यसेवेच्या मदतीसाठी समाजाच्या सहकार्यातून एक स्वतंत्र निधी उभारण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  या कार्यक्रमाला केन्द्रीय सचिव सर्वश्री राजेन्द्र देशमुख,कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख,केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी संतोषजी हूशे,पुष्पराज गावंडे,विजयराव देशमुख, डॉ.विनय दांदळे, डॉ.योगेश साहू,निशाली पंचगाम,सौ.जया भारती,संदिप देशमुख,सहा‌.धर्मदाय विभागाचे निरीक्षक अनुपजी देशमुख,बाळापूरचे पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे,कृष्णा देशमुख,संतोषबाप्पू देशमुख, टेकाडे (चिखली) महादेव लूले,के.एम.देशमुख,मनोज देशमुख,सुरेश पाचकवडे, देवीदास घोरळ,सागर लोडम,मनोहर मोहोड,दिलीप नवले,रवि पाटणे,सतिश देशमुख,अनिल शित्रे,सौ.शोभाताई अग्रवाल,सुधाकर पागृत ,प्रशांत साबळे,सौ.सुवर्णा साबळे ,आशा साबळे व अनेक पत्रकार व स्नेही मंडळी उपस्थित 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here