विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे “गुगल जेन एआय स्टडी” हा उपक्रम यशस्वी संपन्न
विद्या विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे प्रथम वर्ष ते अंतिम वर्षात शिकणाऱ्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “गुगल डेव्हलपर ग्रुप्स” (Google Developer Groups On Campus ) द्वारे आयोजित केलेला “GenAI Study Jam” हा उपक्रम ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संपन्न झाला. हा उपक्रम तब्बल एक महिना चालला. या महाविद्यालयातील १२० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत हिरारीने व उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. अत्याधुनिक Vertex AI, Prompt Engineering, हे शैक्षणिक प्रवासातील अत्याधुनिक स्वरूपाचे प्राथमिक व्यासपीठ होते. “GenAI Study Jam” हा ३० दिवसांच्या कालावधीत सहभागी विद्यार्थ्यांना “GenAI” संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी तयार केलेला एक उत्कृष्ठ प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक “GenAI Study “ तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी मूलभूत ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची उत्कृष्ट संधी मिळते. राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण भारतातील 7०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग मिळाला, ज्यामुळे हा खरोखरच एक व्यापक उपक्रम बनला. “GenAI Study Jam” हे डेव्हलपरसाठी समुदायाद्वारे चालवलेले अभ्यास गट आहेत. गुगल “GenAI Study” या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच यांची या विषयातील आवड, अभ्यासक्रमाविषयीचे असणारे आकर्षण या गोष्टी लक्षात घेऊन गुगल यांनी “GenAI Study Jam” या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना Google Developer Groups On Campus , GenAI Study swag , टी-शर्ट, पाण्याची बाटल , बॅकपॅक ,mug यासारख्या वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम 14 जाने. २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, डॉ. परशुराम चित्रगार, डॉ. राजवीर शास्री, संगणक विभाग प्रमुख तथा या उपक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. ज्ञानकमल छाजेड आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी संगणक(Computer) व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान (AIDS) या विषयात असलेल्या नोकरीच्या व व्यवसायाच्या विविध संधी तसेच भविष्यकाळात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व आव्हाने या विषयी विद्यार्थ्यांना मोजक्या भाषेत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. संपूर्ण देशातून या उपक्रमामध्ये ज्या ज्या महाविद्यालयांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेऊन हा उपक्रम अत्यंत उत्कृष्टपणे पारपाडला त्या १०% महाविद्यालयांमध्ये विद्या विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाचे नाव दाखल आहे हि विद्याप्रतिष्ठान संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गुगल डेव्हलपर ग्रुप्स या विद्यार्थी संघाची प्रमुख नेहा छाजेड तसेच स्वानंद आरगडे, जय माने, श्रेयस सावंत, अक्षता नाळे, प्रतीक्षा रेळेकर व विद्यार्थी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.