विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी गिरवणार सायबर सुरक्षेचे धडे

0
105

विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी गिरवणार सायबर सुरक्षेचे धडे
बारामती: येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याबरोबरच सामाजिक, व व्यावहारिक अनुभवातून सायबर सुरक्षेचे धडे मिळणार आहेत. या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून मागील वर्षी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी.ए.) विभाग आणि क्विकहिल फाउंडेशन या दोन संस्थेमध्ये कमवा आणि शिका या उपक्रमाअंतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि क्विक हिल फाउंडेशनचे श्री.अजय शिर्के यांनी स्वाक्षरी केली.
या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक जागरूकतेमध्ये सक्षमपणे सहभागी करून घेणे आहे. या करारा अंतर्गत चालणार्‍या या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना विविध शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन समाजातील सर्व घटकांमध्ये सायबर जागृतीचे काम करावयाचे आहे. दोन्ही संस्था या योजनेच्या यशस्वीतेसाठी वचनबद्ध असणार आहेत. क्विकहिल फाउंडेशन हे सायबर सुरक्षेसाठी जगभर ओळखले जाते.
या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सलमा शेख या शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत व शिवानी छेडे, सागर मेरावी, रितेश धापटे, ऋतुजा कळसकर हे विद्यार्थी क्लब मेंबर म्हणून काम पाहणार आहेत.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार, बी.एस.सी.(संगणक शास्त्र) विभाग प्रमुख गजानन जोशी, बी.एस.सी.(संगणक उपयोजन) विभाग प्रमुख किशोर ढाणे, गौतम कुदळे, डॉ. जगदीश सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे, अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले. या करारासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ऍड.नीलिमा गुजर, डॉ.राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोंज यांनी महाविद्यालयातील सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here