विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थिनीचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत(Quiz Competition) प्रथम पारितोषिक

0
203

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थिनीचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत(Quiz Competition) प्रथम पारितोषिक

प्रतिनिधी : bhavnagari :

MIT World Peace University’s ASHRAE विद्यार्थी शाखेने ASHRAE पुणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी “HVACR क्षेत्रातील विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. ASHRAE हि अमेरिकेची संस्था आहे आणि याच्या शाखा जगभरात आहेत. विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती ASHRAE विद्यार्थी शाखेमधील १४ विद्यार्थ्यांसह प्रा. केशव जाधव यांनी भाग घेतला. या कार्यशाळे अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा(Quiz Competition) देखील आयोजित करण्यात आली होती यामध्ये द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी कु. अर्पिता आडकी हिने या स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रा. स. बिचकर व डॉ. परशुराम चित्रगार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here