विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा या विषयावरील पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक

0
175

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा या विषयावरील पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ११ स्वयं सेवकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. ही कार्यशाळा २० मार्च २०२३ रोजी पुणे येथील समाजभूषण बाबुराव ऊर्फ अप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे यांनी आयोजित केली होती. वाढती लोकसंख्या व त्याच बरोबर दोन चाकी व चार चाकी वाहनांचा वाढलेला वापर व त्याचा रस्ते वाहतुकीवर होणार विपरीत परिणाम, त्यामुळे होणारे अपघात याचे समाजाला भान असायला हवे व त्याच्याच जनजागृतीसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये रस्ता सुरक्षा या विषयावरील पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यशाळेत पुणे विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा या विषयावरील पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. या संपूर्ण गटाचे नेतृत्व स्वयंसेवक विद्यार्थिनी शेंडे पूजा पांडुरंग (BE. Elect.) हिने केले.
त्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. उमेश जगदाळे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज या सर्वानी यांनी त्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here