![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2024/10/1001434809.jpg)
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांची
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2024/10/1001434810.jpg)
कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्ष आर्टीफिसेल इंटीलिजन्स आणि डेटा सायन्स या शाखेचा विद्यार्थी अनिकेत जाधव व माहिती आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थिनी श्वेता गवळी या दोन विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी शाखेची पदवी पूर्ण होण्या अगोदरच कॅम्पस प्लेसमेंटमधून राजा सॉफ्टवेअर लॅब पुणे या कंपनीने वार्षिक ७ लाखाचे पॅकेज देऊन त्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. त्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. विशाल कोरे, प्रा. सुरज कुंभार, प्रा. संतोष करे, प्रा. व्यंकटेश रामपूरकर, प्रा. प्रदीप घोरपडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कामासाठी चारुदत्त दाते व प्रवीण नगरे यांचे सहकार्य लाभले. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे