विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे पर्यावरण दिन साजरा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, स्कूल ऑफ आर्किटेक्चर, व वसंतराव पवार विधी महाविद्यालय बारामती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जून २०२४ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पिंपळी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वनपाल आणि वनरक्षक बारामती श्री. बाळासाहेब गोलांडे आणि वनपाल श्री. हेमंत मोरे, श्री. गणेश पोरे यावेळी उपस्थित होते. पिंपळी येथील वनक्षेत्रात करंज आणि चिंच या झाडांची एकूण १७८ झाडांची लागवड २४४ स्क्वेअर मीटर क्षेत्रात करण्यात आली.
पर्यावरणीय संतुलन राखणे व जैवविविधता वाढवणे यासाठी वृक्षारोपण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. झाडांचे संरक्षण करा व संवर्धन करा अशी सूचना वनरक्षक श्री. बाळासाहेब गोलांडे यांनी यावेळी केली.
डॉ. बिपिन पाटील, प्रा. अशोक भुंजे, प्रा. विकास बनसोडे, प्रा. दीपक सोनवणे, श्री. सतिश किकले यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. रोहित तरडे, शेखर रणखांबे, प्रणित माळी, ओंकार राऊळ आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेसाठी वन्यपरिवेक्षक श्री. गोलांडे साहेब यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. या मोहिमेसाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, प्राचार्या आर्कि. राजश्री पाटील आणि प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांचेही बहुमुल्य सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. आणि अशाप्रकारे वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला