लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनतर्फे स्कॉलरशिप कम अ‍ॅडमिशन टेस्ट २०२६ चे आयोजन….!

0
12

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनतर्फे स्कॉलरशिप कम अ‍ॅडमिशन टेस्ट २०२६ चे आयोजन….!

बारामती : प्रतिनिधी

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन (इंग्लिश मीडियम स्कूल), बारामती यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६ साठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप कम अ‍ॅडमिशन टेस्ट २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्यासोबतच आकर्षक शिष्यवृत्ती व रोख बक्षिसांची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही परीक्षा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०. ते ११.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षेत अभ्यासक्रमावर आधारित गणित व विज्ञान विषयांचे १००गुणांचे बहुपर्यायी (MCQ) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती व विषयज्ञानाची चाचणी या परीक्षेद्वारे घेतली जाणार आहे.
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
गट अ : इयत्ता १ ली ते ४ थी
गट ब : इयत्ता ५ वी ते ७ वी
गट क : इयत्ता ८ वी ते १० वी
प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक रोख बक्षिसे व स्कॉलरशिप देण्यात येणार आहेत. यामध्ये
प्रथम क्रमांकास ₹१५,०००
द्वितीय क्रमांकास ₹१०,०००
तृतीय क्रमांकास ₹७,००० इतकी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
तसेच परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹३००० पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, याशिवाय इतर रोख स्वरूपातील बक्षिसांचाही समावेश आहे.
ही परीक्षा सूर्यनगरी जवळ, अर्बनग्राम शेजारी, संभाजीनगर, मिरगाव रोड, बारामती येथे होणार आहे. अधिक माहिती, नोंदणी व मार्गदर्शनासाठी इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी ९५४५१५ ११४७किंवा ९६२३०९०८७३या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
गुणवत्तेवर आधारित शिक्षण, स्पर्धात्मक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनकडून राबविण्यात येणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here