लडकत सायन्स अकॅडमीची 10 वी बोर्ड कार्यशाळा 2025 – उत्साह, ज्ञान आणि प्रेरणांचा संगम….!
बारामती – विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेतील यशासाठी सतत कार्यरत असलेली लडकत सायन्स अकॅडमी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अकॅडमीच्या वतीने आयोजित “10वी बोर्ड परीक्षा कार्यशाळा 2025” ही कार्यशाळा प्रचंड उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
या कार्यशाळेत विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांवरील Fast Revision घेण्यात आले. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टिप्स, सोपे ट्रिक्स आणि आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन मिळाले.
संचालक नामदेव लडकत सर यांनी विद्यार्थ्यांना “इयत्ता 10वी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर संधींबाबत” सविस्तर मार्गदर्शन केले. तर गणेश लडकत सर यांनी गणितातील कठीण क्रिया अगदी सोप्या भाषेत शिकवून विद्यार्थ्यांचे गणितावरील भय दूर केले. गवळी सरांनी इंग्रजी विषयातील बोर्ड पॅटर्न, लेखन कौशल्य आणि व्याकरणावर अत्यंत प्रभावी टिप्स दिल्या.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. विपिन गावंडे सर (असिस्टंट प्रोफेसर, व्ही.पी. कॉलेज, बारामती) यांनी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि इंजिनिअरिंगच्या नव्या शाखांबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह आधुनिक करिअर संधींचे दालन खुले करून दिले.
या प्रसंगी संस्थेच्या शुभांगी लडकत, प्रियांका लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि स्टाफ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता — एका विद्यार्थ्याने सांगितले, “या कार्यशाळेमुळे माझा आत्मविश्वास दुप्पट झाला असून बोर्डच्या परीक्षेत किमान ५ ते १० टक्के अधिक गुण मिळतील.”
पालकांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या “लडकत सायन्स अकॅडमीचे प्राध्यापक कुशल आणि विद्यार्थ्यांप्रती समर्पित आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी अनोखी व प्रभावी आहे.”
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रचंड आग्रहास्तव ही कार्यशाळा पुन्हा एकदा 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व पूर्वनोंदणीसाठी संपर्क: 9545952547
“जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन संचालक नामदेव लडकत सरांनी केले.

