रुग्ण हक्क परिषद पुणे शहराध्यक्ष पदी सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांची दुसऱ्यांदा फेरनिवड – मिलिंद गायकवाड

0
25

रुग्ण हक्क परिषद पुणे शहराध्यक्ष पदी सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांची दुसऱ्यांदा फेरनिवड – मिलिंद गायकवाड

पुणे – रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर कार्यकारिणीची बैठक शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. सहा. पोलीस आयुक्त तथा पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड होते. यावेळी मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. बैठकीस प्रमुख मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले तर परिषदेचे महा. प्रदेश उपाध्यक्ष अजय विरकर, पश्चिम महा. समन्वयक के. सी. पवार, विदर्भ विभागाचे समन्वयक एकनाथ पातुरकर प्रमुख उपस्थित होते.

पुणे शहर कमिटीतील पदाधिकारी खालील प्रमाणे –

१) सौ. अपर्णा मारणे साठ्ये – पुणे शहराध्यक्ष
२) श्री राहुल हुलावळे – पुणे शहर कार्याध्यक्ष (पूर्व विभाग)
३) श्री. राजेश अडसूळ – पुणे शहर कार्याध्यक्ष (प. विभाग)
४) सौ. प्रभा अवलेलू – प्रमुख संघटक, पुणे शहर
५) श्रीम. रेश्माताई जांभळे – संघटक, पुणे शहर
६) श्री. फारुक सोलापूरे – पुणे शहर सल्लागार
७) डॉ. सुनील साळवे – पुणे शहर उपाध्यक्ष
८) श्री. बुद्धभूषण निकम – पुणे शहर उपाध्यक्ष
९) सौ. रेखाताई वाघमारे – पुणे शहर उपाध्यक्ष
१०) श्री. उमर शेख- पुणे शहर संपर्कप्रमुख (राजकीय विभाग)
११) श्री श्याम पुणेकर – पुणे शहर संपर्कप्रमुख (जनरल)
१२) सौ. शारदाताई लडकत – पुणे शहर सरचिटणीस
१३) सौ. चित्राताई साळवे – पुणे शहर सचिव
१४) कु. गौरव चव्हाण – निमंत्रक, पुणे शहर
१५) कु. मल्हार कदम- निमंत्रक, पुणे शहर
१६) कु. अनिल पुटगे – युवा समन्वयक, पुणे शहर
१७) श्री. दिलीप साळुंखे – कार्यालयीन सचिव, पुणे शहर
१८) कु. अमृता जाधव- कार्यालयीन उपसचिव, पुणे शहर
१९) सौ. मंदाताई साठे – विभाग अध्यक्ष ( कसबा विधानसभा )
२०) श्री. दिलीप ओव्हाळ – सदस्य, पुणे शहर
२१) श्री. अशोक भोसले- सदस्य, पुणे शहर

    रुग्ण हक्क परिषदेची पुणे शहर कमिटी गठीत करण्यात आली असून पुणे शहरात ठीक- ठिकाणी नव्याने शाखा उभारणी करण्यात येणार आहे. रुग्ण हक्क परिषदेचे कार्यक्रम- उपक्रम, आंदोलन मोर्चे, बैठका, मेळावे यामध्ये परिश्रम घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीत नव्याने स्थान देण्यात आले असून नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील गोरगरीब सामान्य रुग्णासाठी - सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी  झटत राहून काम करू, असे पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here