राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक

0
258

प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक

‘सीईटी सेल’

पुणे, राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. यांसह विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य कालावधी सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा झाल्यानंतर अभियांत्रिकी, विधी यांसह विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे

आयोजन सीईटी सेलच्या वतीने करण्यात येते.

यंदा ‘सीईटी सेल’कडून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील जवळपास २० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. या प्रवेश परीक्षेसह संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते. ‘सीईटी सेल ने प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर केल्यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी साधारणतः चार लाखांहून अधिक विद्यार्थी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज करतात. त्याखालोखाल एमबीए, विधी, एमसीए अशा अभ्यासक्रमांना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.

संभाव्य वेळापत्रक पाहण्यासाठी संकेतस्थळ: https://cetcell. mahacet.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here