पिंपळीत श्री स्वामी समर्थ क्लिनिकच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
बारामती:
शिबिराचा शुभारंभ डॉ.निशिगंधा ठेंगल यांचे वडील दिलीप ठेंगल व मातोश्री राणी ठेंगल यांचे हस्ते आरोग्य देवता भगवान धन्वंतरी यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
पिंपळी येथील बीएचएमएस
डॉ.निशिगंधा ठेंगल यांचे श्री स्वामी समर्थ क्लिनिकच्या वतीने पिंपळी लिमटेक भागातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या माध्यमातून ७७ महिला व नागरिकांची मोफत
तपासणी डॉ.निशिगंधा ठेंगल, डॉ.वर्षा घोरपडे-बीएचएमएस, डॉ.दिपाली शिंदे- बीएएमएस यांनी केली.
या शिबिरात तीन डॉक्टरांसह सहा नर्स स्टाफने सहभाग घेतला होता.
या तपासणी शिबिरात बीपी, शुगर, थायरॉड, ईसीजी विविध रक्त तपासणी करण्यात आल्या तसेच किडनी यकृत व पोटातील आजार, महिलांमधील हिमोग्लोबिन व इतर समस्याबद्दल तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान नागरिक व आजार ग्रस्त नागरिकांना आरोग्यमुक्त राहण्यासाठी तसेच दुर्धर आजार आणि नुकतेच आजार झाल्यानंतर कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे व रोजच्या जेवणात कोणकोणते सकस आहार घेतले पाहिजेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन डॉ.निशिगंधा ठेंगल,डॉ. वर्षा घोरपडे, डॉ. दिपाली शिंदे यांनी केले.
तसेच या तपासणी दरम्यान किडनी शस्त्रक्रिया, प्रोस्टेट शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटल द्वारे मोफत केले जाणार असल्याची माहिती डॉ. यांनी दिली.
यावेळी मा. उपसरपंच अश्विनी बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे तसेच प्रसन्ना थोरात, समशेर इनामदार, राजेंद्र ठेंगल आदींसह तपासणीस आलेले नागरिक आणि महिला बहूसंख्येने उपस्थित होते.





