मुंबईत भक्तीचा महाकुंभ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री.संतसेना महाराजांच्या पादुकांचे दर्शन

0
18

मुंबईत भक्तीचा महाकुंभ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतसेना महाराजांच्या पादुकांचे दर्शन

मुंबई, ८ मार्च २०२५ – महाराष्ट्राच्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा भव्य “भक्तीचा महाकुंभ” सोहळा मुंबईच्या वरळी येथील NSCI Dome मध्ये ८ आणि ९ मार्च रोजी अत्यंत भक्तिभावाने साजरा झाला. या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्रातील २१ संत, योगी आणि समाजप्रबोधन करणाऱ्या विभूतींच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळाली.

सोहळ्याचा उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यांनी श्री संतसेना महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्यासोबत पादुकाचार्य ज्ञानेश्वर रायकर, नगरसेवक शंकर रायकर, विष्णु रायकर, विनायक क्षीरसागर, आणि विनायक गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाचा हा सोहळा म्हणजे भक्तीचा अनोखा संगम आहे. संतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेणे हे खरे धन्यत्व आहे.”

या भक्तिमय सोहळ्यात संत तुकाराम, ज्ञानेश्वर, निळोबाराय महाराज, जनाबाई, मुक्ताई, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज (शिवपुरी), शंकर महाराज, संत सावता माळी, संत रोहिदास महाराज, नरहरी सोनार, संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, डॉ. बालाजी तांबे, आणि कुलस्वामिनी करवीर महालक्ष्मी यांच्यासह २१ संतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याची भाविकांना संधी मिळाली.

या अध्यात्मिक पर्वणीचे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’ ने केले होते. सोहळ्यात डॉ. वामन पै यांचे चिरंजीव अध्यात्मिक पै. महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक विचारांची मांडणी केली, तर अभिजीत पवार यांनी संत महात्म्यांचा समाजकारणातील महत्त्व सांगितले.

या दोन दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सहभागी होऊन भक्तीचा अनुभव घेतला. संपूर्ण परिसरात पंढरीचे साक्षात दर्शन झाल्याचा भास उपस्थित भाविकांना झाला.

‘भक्तीचा महाकुंभ’ हा सोहळा केवळ अध्यात्मिक दर्शनाचा उत्सव नव्हता, तर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गौरव करण्याचा एक सुंदर उपक्रम ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here