माळेगाव साखर कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकरण झालेल्या पुतळ्याचे भव्य अनावरण!

0
100
Oplus_131104

माळेगाव साखर कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकरण झालेल्या पुतळ्याचे भव्य अनावरण!

माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज, शुक्रवार (ता. 28) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, त्यामुळे माळेगावच्या गौरवशाली वारशाला नवसंजीवनी मिळाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी दिली.

या अनावरण सोहळ्यास शेतकरी, कारखान्याचे हितचिंतक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यस्थळी उभारलेला हा भव्य पुतळा छत्रपती शिवरायांच्या शौर्याची आणि प्रेरणेची साक्ष देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here