माळेगाव सहकारी साखर कारखान्यात माजी संचालक नितीन कुमार शेंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत
माळेगाव, दि. २० फेब्रुवारी: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात बऱ्याच दिवसांनंतर आलेल्या माजी संचालक नितीन कुमार शेंडे यांचे कर्मचारी वर्गाने आनंदाने स्वागत केले. कार्यालयात प्रवेश करताच तेथील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने पुढे येत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “दादा, तुम्ही संचालक असताना आम्हाला चांगली वागणूक दिली होती. म्हणूनच आजही तुम्हाला पाहून आनंद झाला. तुम्ही आम्हाला नेहमीच मान-सन्मान दिला आणि त्यामुळे आजही आमच्याकडून तुम्हाला तशीच सन्मानपूर्वक वागणूक मिळते.”
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी शेंडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनीही कर्मचाऱ्यांच्या हिताची विचारपूस केली आणि कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत जाणून घेतले.
यावर प्रतिक्रिया देताना नितीन कुमार शेंडे म्हणाले, “पद असो वा नसो, प्रत्येकाने मानवतेचा विचार करून सहकाऱ्यांना योग्य सन्मान द्यावा.
