महावितरणने देखभाल दुरुस्ती यंत्रणा सक्षम करावी – धनंजय जामदार

0
77

महावितरणने देखभाल दुरुस्ती यंत्रणा सक्षम करावी – धनंजय जामदार

बारामती एमआयडीसी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी औद्योगिक क्षेत्राचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे तसेच व्होल्टेज चढउतारामुळे उद्योगांची किमती उपकरणे निकामी होत आहेत व प्रक्रियेतील कच्चा माल वाया जाऊन उद्योगांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. महावितरणने वीजबिघाड दुरुस्ती यंत्रणा सक्षम करुन उद्योगाचा वीजपुरवठा सुरळीत होणेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी बारामती इंडस्ट्रियाल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी महावितरणच्या प्रशासनाकडे केली आहे.

ऊर्जा भवन येथे झालेल्या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मधुकर साळवे, अभियंता राजेश भगत यांच्यासह किर्लोस्कर फेरस चे उपाध्यक्ष किशोर भापकर, जीटीएन सूतगिरणीचे प्रमुख उद्धव मिश्रा, कॉटनकिंगचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, राजन नायर, उद्योजक रमाकांत पाडूळे, महावीर कुंभारकर, अली जेतपुरवाला,अनिल काळे, अरुण म्हसवडे, सुभाष शिंदे, पंकज पवार, दत्तात्रय वाबळे, संतोष कणसे आदि उद्योजक उपस्थित होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले महावितरणने औद्योगिक क्षेत्रात नियमितपणे सर्वेक्षण करून धोकादायक झाडांचा बंदोबस्त तसेच विद्युत वाहिन्या, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, ट्रांसफार्मर आदींची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करणे अत्यावश्यक आहे. तसेच गेल्या दहा वर्षापासून चोवीस तास उपलब्ध असणारे देखभाल दुरुस्ती वाहन अचानक बंद करण्यात आले आसलेने उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे. सदर देखभाल दुरुस्ती वाहन सेवा तातडीने पूर्ववत चालू करावी अशी मागणी अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली.

वादळी वारे व पाऊसमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करत असून पुढील काळात योग्य ती आगाऊ खबरदारी घेण्यात येईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here