महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, पुणे जिल्हा तसेच बारामती तालुका नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष व कार्यकारिणी निवडणूक
बारामती (१५ मार्च २०२५) – बारामती तालुका नाभिक महामंडळाच्या अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड उद्या शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश राऊत, पुणे जिल्हा अध्यक्ष अशोकराज मगर, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. मंगलाताई आढाव, माजी अध्यक्ष श्री. शंकर तात्या मर्दाने तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. सुदामराव गवळी, श्री. अंकुश महादेव जाधव उपस्थित राहणार आहेत.
तसेच, श्री. सुनिल जगताप, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सुनील वाळुंजकर, तानाजी वाळुंजकर (कोषाध्यक्ष, पुणे जिल्हा), मच्छिंद्र बिडवे (संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), तेजस पंडित (सरचिटणीस, पुणे जिल्हा), आदिनाथ गायकवाड, लालासो जाधव, गणेश काशीद (सरपंच, मेडद) या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या चे आयोजन आयोजक:
वडगाव निंबाळकर नाभिक महामंडळ शाखा वडगाव निंबाळकर
बारामती तालुका नाभिक संघटना यांनी केले.
सर्व बारामती तालुक्यातील समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

