महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त “कारभारी प्रीमियर लीग Kpl आयोजित बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर चित्त थरारक क्रिकेट संपन्न …

0
94

प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त कारभारी प्रिमियर लिग २०२४ बारामती.


दि.२० मार्च २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर मोठ्या दिमाखात क्रिकेटचे सामने पार पडले.
या सामन्यात १९ वर्षा खालील आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले तसेच महाराष्ट्र रणजी करंडक व महाराष्ट्र प्रिमियर लिग स्पर्धेत सहभागी झालेले अनेक प्रतिभावंत खेळाडू यांनी या कारभारी प्रीमियर लीग २०२४ या स्पर्धेत सहभाग घेतला.त्यामुळे बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना या खेळाडूंचा प्रत्यक्ष खेळ पाहण्याची संधी मिळाली.


दि.२० मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान या स्पर्धेत चार विभागांत संघाची विभागणी करुन साखळी सामने खेळविण्यात आले.दि.१ एप्रिल ते २ एप्रिल २०२४ रोजी उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले.दि.३ एप्रिल रोजी उपांत्य फेरीचे दोन सामने झाले.

यामध्ये विजयी झालेले संघ म्हणजे मेवरिक्स बाॅईज पुणे व माणिकचंद ऑक्सिरीच पुणे हे अंतिम फेरीत पोहचले.या दोन संघामध्ये दि.४ मार्च रोजी अंतिम सामना खेळला गेला. हा सामना फारच रोमहर्षक व उत्कंठावर्धक असाच झाला.अगदी सुपर ओव्हर पर्यंत हा सामना खेळला गेला.अगदी अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने मेवरिक्स बाॅईज पुणे संघावर मात करुन “कारभारी प्रीमियर लीग २०२४” चषक पटकावला.
अंतिम सामन्यात मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने १८.५ षटकात सर्व बाद २०६ धावा केल्या.एकवेळ मेवरिक्स बाॅईज पुणे संघाची १५ षटकात १९३ धावा आणि ७ खेळाडू बाद झाले होते.अंतिम ५ षटकात माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने खेळामध्ये वापसी करत ५ षटकात केवळ १४ धावाच मेवरिक्स बाॅईज पुणे संघाच्या धावा रोखत सर्व बाद २०६ धावा करु दिल्या.


मेवरिक्स बाॅईज पुणे संघाकडून शुभम तैस्वाल याने आक्रमकपणे फलंदाजी करत केवळ ३२ चेंडूत ७६ धावा केल्या यात त्याने चार षटकार व दहा चौकार लगावले. नौशाद शेख २९ धावा तर जॉन साने याने २४ धावाचे योगदान दिले. माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाकडून अतिश कुंभार ३, उमर शाह,निलय नेवासकर, निमिर जोशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.


उत्तरा दाखल फलंदाजी साठी उतरलेल्या माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने २० षटकात ८ बाद २०६ धावा केल्याने सामना टाय झाला. माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा निलय नेवासकर याने केल्या. त्याने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या.यात त्याने चार उत्तुंग षटकार लगावले.इतर खेळाडू अभिमन्यु जाधव १६ चेंडूत ३७ धावा,कृष्णा पवार याने १५ चेंडूत ३४ धावा तर अभिजित भगत व अतिश कुंभार यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या.


त्यामुळे सामना सुपर ओव्हर मध्ये खेळविण्यात आला.यामध्ये माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने प्रथम फलंदाजी करत सहा चेंडूत २२ केल्या. मेवरिक्स बाॅईज पुणे संघाला सहा चेंडूत फक्त १९ धावा करता आल्या.त्यामुळे हा सामना माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघाने जिंकून कारभारी प्रिमियर लिग, बारामती २०२४ चषक जिंकला. अंतिम सामन्यात सामना वीर म्हणून निलय नेवासकर यास घोषित करण्यात आले. अंतिम सामन्यात विजेता संघ माणिकचंद ऑक्सिरीच पुणे या संघास रु.दोन लाख व ट्रॉफी, उपविजेता मेवरिक्स बाॅईज पुणे संघास रु.एक लाख व ट्रॉफी. तर स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून हरी सावंत यांस इलेक्ट्रीकल टु व्हीलर देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत अनेक वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली.

यात
उत्कृष्ट फलंदाज – धीरज फटांगरे
उत्कृष्ट गोलंदाज- हुजेफ शेख
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- सिद्धेश जाधव
सर्वोत्कृष्ट झेल – कुणाल फणसे
उत्कृष्ट यष्टिरक्षक – सुरज शिंदे
स्पर्धेचा मानकरी – हॅरी सावंत
सर्वांना प्रत्येकी रु.१००००/- व ट्रॉफी देण्यात आली.
सर्वोत्कृष्ट झेलचे पारितोषिक विजेता कुणाल फणसे हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केलेले आहे.तसेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता.
या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेले महाराष्ट्र प्रिमियर लिग संघातील संघ मालक पुर्णपणे लक्ष ठेवून होते.या साठी
कोल्हापूर टस्कर,
ईगल नाशिक,
छ्त्रपती संभाजीनगर,
पुणेरी बप्पा या संघात निवड होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण मा.श्री पुनित (दादा) बालन, पुनित बालन ग्रुप,पुणे व मा.श्री केदार जाधव माजी अष्टपैलू खेळाडू भारतीय क्रिकेट संघ यांचे हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मा.श्री दौलत देसाई माजी IAS अधिकारी,मा.श्री अमित मोडक CEO,पुना गाडगीळ ॲन्ड सन्स लि.,मा.श्री दुर्योधन भापकर उपाध्यक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे,मा.श्री रवी (आबा) काळे प्रसिद्ध उद्योजक, बारामती,मा.श्री रोहितशेठ सराफ प्रसिद्ध उद्योजक बारामती,मा.श्री योगेश (भैय्या) जगताप संचालक, माळेगांव सहकारी साखर कारखाना,शिवनगर ,मा.श्री प्रसाद शेट्टी प्रसिद्ध उद्योजक बारामती,मा.श्री निलेश कुलकर्णी प्रसिद्ध उद्योजक बारामती,मा.श्री राजन कोळेकर प्रसिद्ध उद्योजक बारामती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक भाषण या स्पर्धेचे आयोजक तथा कारभारी प्रीमियर लीग, बारामती चे (KPL) अध्यक्ष मा.श्री प्रशांत (नाना) सातव यांनी केले.त्यांनी आपले प्रास्ताविक पर भाषणात या स्पर्धा आयोजित करताना १९ वर्षा खालील आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले तसेच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, जम्मू आणि काश्मिर रणजी ट्रॉफी व महाराष्ट्र प्रिमियर लिग सारख्या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना भविष्यात पुढे भारतीय संघात तसेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारख्या स्पर्धेत संधी उपलब्ध व्हावी.

आपले खेळातील गुणांना न्याय मिळावा.तसेच अनेक प्रतिभावंत खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे.तसेच बारामती सारख्या एका विकसित शहारातील क्रिकेट रसिकांना चांगल्या क्रिकेट आस्वाद घेता यावा.अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेक मान्यवर यांनी आर्थिक स्वरूपात तसेच भेट वस्तू स्वरूपात देणगी दिली त्या देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा.श्री पुनित (दादा) बालन,पुनित बालन ग्रुप,पुणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गेली सतरा वर्षे श्री प्रशांत नाना सातव हे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत, त्यामुळे अनेक खेळाडूंना त्यांच्या पुढील क्रिकेट खेळासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत.येथील क्रिकेट खेळाचे एकुणच आयोजन पाहून भविष्यात दिवस रात्रीचे सामने भरविण्यात येतील असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.


दुसरे प्रमुख अतिथी मा. श्री केदार जाधव माजी अष्टपैलू खेळाडू भारतीय संघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की क्रिकेट खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे.त्यांनी त्यांची मोठी स्वप्ने पहावी.व त्या स्वप्नपूर्तीसाठी मात्र अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवा म्हणजे तुमची स्वप्ने पुर्ण होतील.


हे सामने पाहण्यासाठी बारामती व पंचक्रोशीतील अनेक क्रिकेट रसिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेतला.

त्याच बरोबर आयोजकांनी या सामन्याचे थेट प्रक्षेपण यूट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध केले होते.याचा सुद्धा अनेक क्रिकेट रसिकांना आनंद घतला .

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त “कारभारी प्रीमियर लीग बारामती,२०२४ स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघ विजयी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here