महसूल पंधरवड्यानिमित्त तालुक्यात वारसनोंदी शिबीराचे २९ ऑगस्टपर्यंत आयोजन

0
67

महसूल पंधरवड्यानिमित्त तालुक्यात वारसनोंदी शिबीराचे २९ ऑगस्टपर्यंत आयोजन

बारामती, दि.७: महसूल पंधरवड्यानिमित्त तहसील कार्यालयाच्यावतीने तालुक्यात २९ ऑगस्टपर्यंत आयोजित वारसनोंदी शिबीरात पहिल्याच दिवशी नागरिकांकडून १०५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तालुक्यातील नागरिकांचे काम सुलभ व जलदगतीने व्हावे, याकरीता मंडळनिहाय तलाठी कार्यालयात या शिबीराला मंगळवारपासून (६ ऑगस्ट) सुरुवात करण्यात आली आहे. वारस नोंदीबाबत बारामती मंडळात ३८, काटेवाडी २, उंडवडी क.प. १२, शिर्सूफळ १७, सुपा १, मोरगाव ४, लोणी भापकर ३, करंजे पूल ६, वडगाव निंबाळकर ७, पणदरे २ आणि माळेगाव बु. मंडळात १३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

तालुक्यात जळोची, कन्हेरी, मेडद, पारवडी, भोंडवेवाडी, आंबी बु., पळशीवाडी, निंबुत, होळ, पवईमाळ आणि माळेगाव बु. येथे ८ ऑगस्ट रोजी, रुई, सोनगाव, गोजुबावी, निंबोडी, पानसरेवाडी, तरडोली, माळवाडी, मुरुम, कोऱ्हाळे बु., धुमाळवाडी, माळेगाव खु. येथे १३ ऑगस्ट, डोर्लेवाडी, झारगडवाडी, जळगाव सुपे, कटफळ, वढाणे, बाबुर्डी, जळगाव क.प., वागळवाडी, करंजे, कोऱ्हाळे खु., मानाप्पावाडी आणि पाहुणेवाडी येथे २० ऑगस्ट, मळद, सावळ, कऱ्हा वागज, जराडवाडी, देऊळगाव रसाळ, मुर्टी, काऱ्हाटी, करंजे, शिरष्णे, ढाकाळे आणि खांडज येथे २२ ऑगस्ट रोजी तर गुणवडी, मेखळी, तांदुळवाडी, कारखेल, नारोळी, मोढवे, मुढाळे, वाकी, लाटे, सांगवी आणि निरावागज येथे २९ ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीर यशस्वी होण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, रास्तभाव दुकानदारांनी या कामी सहकार्य करावे. नागरिकांनी गावात होणाऱ्या शिबीराच्या दिवशी उपस्थित राहून वारस नोंदीकरीता लागणारी कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करावी, असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here