मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

0
24

मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती 20: बारामती विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना तसेच परिसरातील नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व समजावून सांगावे तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत राधेश्याम एन. अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वीप समन्वयक सविता खारतोडे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कल्याण देवडे आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, भारतीय लोकशाहीत मतदानाचे महत्त्व नमूद करुन मतदारसंघात मतदार जनजागृती उपक्रम मतदानाच्या टक्केवारीत वाढविण्याच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना संकल्प पत्रांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here